Gadchiroli Naxalism : दोन जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; गडचिरोली पोलीस दलाची यशस्वी कामगिरी

143
Gadchiroli Naxalism : दोन जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; गडचिरोली पोलीस दलाची यशस्वी कामगिरी

गडचिरोलीमध्ये नक्षल (Gadchiroli Naxalism) सप्ताह सुरु होण्यापूर्वीच दोन जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. या दोघांवर तब्बल ८ लाख रुपयांचे बक्षीस होते. या दोन नक्षलवाद्यांनी सोमवार २४ जुलै रोजी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. अडमा जोगी मडावी (वय. २६ जिलोरगडा जि. बिजापूर) आणि टुगे कारू वड्डे (वय ३२, रा. बैरामगड जि.बिजापूर) अशी या दोन नक्षलवाद्यांची नावे आहेत. त्यांनी हिंसाचाराला कंटाळून पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या समोर आत्मसमर्पण केले.

दरवर्षी २८ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान नक्षलवाद्यांचा (Gadchiroli Naxalism) शहीद सप्ताह असतो. या काळात नक्षलवादी हिंसाचार घडवतात. परंतु, शासनाकडून जाहीर आत्मसमर्पण योजना आणि चकमकीत ठार होणाऱ्या नक्षल्यांची वाढती संख्या पाहून या दोघांनी आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला. अडमा मडावी आणि टुगे वड्डे यांच्यावर पोलिसांनी तब्बल ८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. अडमा मडावी हा जुलै २०१४ रोजी पामेड एलजीएसमध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन २०२१ पर्यंत कार्यरत होता. अडमावर चकमकीचे ८ गुन्हे, ५ हत्या, जाळपोळ आणि इतर गुन्हे दाखल आहेत. त्यासोबतच २०१८ मधील मुरडोंडा भुसुरूंग स्फोट, झारापल्ली चकमकीसह इतरही अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता.

(हेही वाचा – Heavy Rain : मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट)

अशाच प्रकरचे गंभीर गुन्हे टुगे वड्डे (Gadchiroli Naxalism) याच्यावरही दाखल आहेत. टूगे वड्डे हा सन २०१२ ला जाटपूर दलम जनमिलीशीय सदस्य पदावर भरती होऊन सन २०२३ पर्यंत कार्यरत राहुन घरी परत आला होता. तसेच त्याचा सहा निरपराध माणसांच्या खुनात प्रत्यक्षरित्या सहभाग होता. तसेच २०२२ मध्ये मौजा ईरपनार (म.रा.) येथील रोड कामावरील १२ (ट्रॅक्टर, जेसीबी) वाहनांची जाळपोळ करण्यात त्याचा सहभाग होता. महाराष्ट्र शासनाने अडमा जोगा मडावी याच्यावर ६ लाख रूपयाचे बक्षीस तर टूगे कारु वड्डे याच्यावर २ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडून अडमा जोगा मडावी याला एकुण ४ लाख ५० हजार रुपये व दुगे कारु वड्डे याला एकुण ४ लाख रुपये बक्षीस जाहीर केले आहे.

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेने प्रभावीत झाल्यामुळे. या नक्षलवाद्यांनी (Gadchiroli Naxalism) हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला. तसेच पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत त्यांनी आत्मसमर्पण केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.