Gadchiroli Naxalite : नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले, गडचिरोली जिल्ह्यात बोटावर मोजण्याइतके नक्षली शिल्लक

32

Gadchiroli Naxalite : देशाचे गृहमंत्री अमित शाह (Minister Amit Shah) यांनी मार्च २०२६ अखेर देश नक्षलमुक्त (Naxal free India) करण्याची घोषणा केली आहे. सरकार त्याअनुषंगाने कठोर पावले उचलत आहे. पोलीस आणि सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांचे (Naxalism) कंबरडे मोडले आहे. आता आपल्या अस्तित्वासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे. तथापि, गडचिरोली जिल्ह्यात बोटावर मोजण्याइतके नक्षली शिल्लक राहिले असले तरी शेजारच्या छत्तीसगड राज्यातील नारायणपूर आणि विजापूर जिल्ह्यातून नक्षलवाद समूळ नष्ट होणार नाही, तोपर्यंत गडचिरोलीतील नक्षलवादी संपला, असे म्हणता येणार नाही. मागील ४५ वर्षांपासून सुरक्षा यंत्रणांची धडधड वाढविणारे नक्षलवादी आता स्वतःच गुदमरलेल्या अवस्थेचा सामना करीत आहेत. १५ वर्षांपूर्वी २० असलेली दलमसंख्या आता अवघ्या तीनवर राहिली आहे. दाट जंगलात पोलिसांनी नक्षल्यांचा कोंडमारा केला आहे. त्यातून मुक्ती मिळविण्यासाठी नक्षल्यांची अखेरची धडपड सुरू असल्याचे दिसून येते.  (Gadchiroli Naxalite)

गडचिरोलीत असा स्थिरावला नक्षलवाद १९६६-६७ च्या सुमारास जमीनदारांकडून होणाऱ्या शोषणाविरुद्ध पश्चिम बंगालच्या ‘नक्षलबारी’ खेड्यातून उभी झालेली सशस्त्र गडचिरोलीतील नक्षलवादाचा इतिहास  माओवादी संघटना  (Maoist organization)आंध्र प्रदेशमार्गे गडचिरोली जिल्ह्याच्या हिरव्या गर्द झाडीत येऊन स्थिरावली. १९८० मध्ये तत्कालीन अविभक्त आंध्र प्रदेशातून नक्षल्यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यात प्रवेश केला. त्याच वेळी त्यांनी राजू मास्टर नामक शिक्षकाचे हात तोडून आपल्या दहशतीचा पहिल्यांदा परिचय करून दिला. हळूहळू नक्षल्यांनी वन कर्मचारी, तेंदू कंत्राटदार, बांबू वाहतूकदार यांच्याकडून कसे शोषण होते, हे सांगत दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींच्या गावात घरठाव करण्यास सुरुवात केली. पुढे तेंदूपाने आणि बांबू तोडणाऱ्या मजुरांची मजुरी वाढवून देत बंदुकीच्या धाकावर नक्षल्यांनी गरीब आदिवासींची मने जिंकली. 

२०१७ पर्यंत नक्षल्यांपेक्षा पोलिसांचेच अधिक नुकसान
पाहतापाहता नक्षल्यांनी सिरोंचापासून कोरचीपर्यंत तेलंगणा आणि छत्तीसगडचे सीमावर्ती तालुके व्यापले. मागील ४५ वर्षात त्यांनी शेकडो निरपराध नागरिकांच्या हत्या केल्या. या लढाईत २१३ पोलिस शहीद झाले. कित्येक कोटी रुपयांच्या शासकीय आणि खासगी मालमत्तेचे नुकसान झाले. साधारणतः २०१७ पर्यंत नक्षल्यांपेक्षा पोलिसांचेच अधिक नुकसान झाले. परंतु २०१८ मध्ये भामरागड़ तालुक्यातील कसनासूर आणि दामरंचा  परिसरात झालेल्या दोन चकमकीमध्ये तब्बल ४० नक्षलवादी ठार झाले. त्यात सिनू, साईनाथे, सतीश हे नक्षल्यांचे कमांडर (Naxalite Commander) ठार झाले. नक्षल्यांना हा पहिलाच मोठा हादरा होता.

(हेही वाचा – ACB : लाचखोरीच्या ४०२ फायली लालफितीत अडकल्या; २ महिन्यांत १७१ लाचखोरांना बेड्या)

नक्षल डीव्हीसी गिरीधर, तारक्का यांचे आत्मसमर्पण
खोब्रार्मेढाच्या चकमकीत नक्षल्यांचा डीव्हीसी भास्कर हादेखील मारला गेला. २०२३ मध्ये मर्दीनटोलाच्या चकमकीत नक्षल्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य मिलिंद तेलतुंबडे याच्या २८ नक्षल्यांना पोलिसांनी कंढ़स्नात घातले. मध्यंतरी नक्षल्यांची गडचिरोली जिल्ह्यातील सर्वेसर्वा नर्मदाक्का हिला तिच्या पतीसह पोलिसांनी अटक केली. अलीकडच्या काळात नक्षल डीव्हीसी गिरीषर, तारक्का यांनी आत्मसमर्पण केले. पोलिसांनी एवढ्या वर्षांमध्ये ८८१ नक्षल्यांना अटक केली.

अलीकडच्या काळात नक्षल चळवळ मोडीत काढण्याच्या दिशेने केंद्र सरकारने जोरदार पावले उचलली आहेत. गडचिरोली पोलिसांनी ‘दादालोरा खिडकी’ (पोलीस दादाची खिडकी) हा उपक्रम राबवून सोशल पोलिसिंगचा मार्ग अवलंबिला. याद्वारे पोलिसांनी स्वतः प्रयत्न करून दुर्गम भागातील हजारो बंचित आदिवासींना आधार कार्ड, रेशन कार्ड, जात प्रमाणपत्रे आणि इतर दस्तऐवज मिळवून दिल्यानं त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येत आहे. २००५ मध्ये आत्मसमर्पण योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत ७०० हून अधिक नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले. १५ वर्षांपूर्वी २० च्या संख्येत असलेल्या नक्षल्यांच्या दलमची संख्या आता केवळ तीनवर येऊन ठेपली आहे आणि कार्यरत सशस्त्र नक्षल्यांचा आकडा केवळ ४३ राहिला आहे.

(हेही वाचा – Uddhav Thackeray अडचणीत?)

बंदुकीच्या धाकावर कंत्राटदारांकडून खंडणी
एकीकडे मजुरांना न्याय मिळवून देताना हे नक्षलवादी बंदुकीच्या धाकावर बांबू आणि तेंदू कंत्राटदारांकडून मोठी खंडणीही वसूल करायचे. १९९६ मध्ये नक्षल्यांची एक डायरी पोलिसांच्या हाती लागली होती. त्यात नक्षलवादी बांबू आणि तेंदू कंत्राटदारांकडून वर्षाला दीड कोटी रुपयांची खंडणी वसूल करीत असल्याचे प्रथमच उघड झालं होतं. (अलीकडच्या काळात ही खंडणी २० कोटीपर्यंत पोहोचली होती) याच खंडणीच्या रकमेतून नक्षलवादी शस्त्रे खरेदी करायचे. त्यासाठी मोठ्या शहरांमध्ये राहून सशस्त्र क्रांतीचे दिवास्वप्न बघणारे समर्थक नक्षल्यांना मदत करायचे.

तेलंगणातील थिंक टैंक पुन्हा सक्रिय ?
नक्षल्यांची गडचिरोलीतील एन्ट्री ही तत्कालिन अविभक्त आंध्रप्रदेशातून (आताचा तेलंगणा) झाली होती. त्यावेळी नक्षल्यांचे मोठे नेते हे उच्चविद्याविभूषित होते. या नेत्यांपैकी अनेक जण ठार झाले आहेत. परंतु अजूनही तेलंगणा राज्यात नक्षल्यांचे थिंक टैंक कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांनी नवी रणनीती आखली तर पुन्हा ही चळवळ डोके वर काळप्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.