गडचिरोली जिल्ह्यातील महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात कोरची तालुक्यातील भिमनखोजी गावानजीकच्या जंगलात गडचिरोली पोलिसांनी नक्षल्यांचे शिबिर उध्वस्त केले. (Gadchiroli)
(हेही वाचा – शपथविधीनंतर पाहू; Amit Shah आणि Devendra Fadnavis यांच्या चर्चेत काय झाले ?)
गडचिरोलीच्या (Gadchiroli) भिमनखोजी जंगलात पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतूने नक्षली एकत्र आले होते. पोलिसांना यासंदर्भातील गोपनीय माहिती मिळताच गुरुवारी संध्याकाळी अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या नेतृत्वात सी-६० पथक आणि केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी त्या भागात नक्षलविरोधी अभियान राबविले. पोलिसांचा दवाब पाहून नक्षली पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरुन पिट्टू, औषध, पुस्तके आणि अन्य साहित्य ताब्यात घेतले, असे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले. (Gadchiroli)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community