नक्षल्यांनी पुरुन ठेवलेला शस्त्र, स्फोटकांचा साठा जप्त

101

नक्षलविरोधी अभियानाचे विशेष अभियान पथक व बी.डी.डी.एस. पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवत असताना नक्षलवाद्यांनी गोपनियरित्या जंगल परिसरात लपवून ठेवलेला शस्त्र, स्फोटकांचा साठा शोधून काढण्यात जवानांना खूप मोठे यश आले आहे. ही कारवाई कुरखेडा उपविभागा अंतर्गत येत असलेल्या जामटोला, बंजारी रिठ जंगल परिसरात करण्यात आली .

सापडला इतका ऐवज

पोलिसांनी या कारवाईत एक जिवंत कुकर बॉम्ब व 4 कुकर असे एकूण 5 कुकर, एक जिवंत डेटोनेटर, 4 जिलेटीन (जेली), 6 स्प्रिन्टर लोखंडी तुकडे, गन पावडर 45 ग्रॅम, मोबाईल चार्जर स्विच, नक्षल शर्ट, नक्षल पॅन्ट व नक्षल पुस्तके तसेच इतर साहित्य मोठ्या प्रमाणात हस्तगत करण्यात आले आहेत. यापैकी जिवंत कुकर बॉम्ब हे बीडीडिएस पथकाच्या मदतीने अत्यंत सतर्कतेने यशस्वीरित्या जागेवरच नष्ट करण्यात आले असून, इतर साहित्य गडचिरोली येथे आणण्यात आले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.

(हेही वाचाः आता बँकिंग सेवा केव्हाही आणि कुठेही !)

अशा पद्धतीने दडवत होते स्फोटके 

जिल्हयामध्ये नक्षल घातपाती हिंसक कारवाया करण्यासाठी विविध प्रकारच्या शस्त्र व स्फोटक साहित्याचा वापर करतात, असे साहित्य ते मोठया प्रमाणात खरेदी करुन ठेवतात व जंगल परिसरातील जमिनीत गोपनियरित्या पुरुन ठेवतात. तसेच काही ठिकाणी रस्ते तसेच सुरक्षा दलांना धोका होऊ शकेल अशा इतर ठिकाणी स्फोटके, शस्त्र साहित्य व दारुगोळा इत्यादी ते गोपनियरित्या जमिनीत पुरुन ठेवतात.

नक्षलवाद्यांना हादरा

टिसीओसी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर सदर डंप हस्तगत केल्यामुळे या भागात नक्षलवाद्यांना मोठा हादरा बसलेला आहे. त्यामुळे नक्षल्यांचे लक्षात आले आहे की, गडचिरोली पोलिस दलाची नजर नक्षल्यांवर असून सामान्य नागरिकांना वेठीस धरुन बळजबरीने टिसीओसी सप्ताह पाळावयास भाग पाडणे नक्षलवाद्यांना आता अडचणीचे ठरणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.