शनिवारी दुपारी गडचिरोली येथील सिरोंचा तालुक्यात दुपारी पाऊणच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. ३.८ मॅग्निट्यूडचा सौम्य धक्का जाणवल्याने संबंधित भागांत नुकसान झाले नाही. शुक्रवारीही साता-यात सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले होते. या दोन्ही घटनांबाबत भूकंपाची माहिती देणा-या सेस्मोलॉजी विभागाकडून नोंद झालेली नसल्याने भूकंपांची नोंद घेणारी मशीन बंद पडल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
( हेही वाचा : दिवाळीत ‘एसटी’ला पसंती; ५ दिवसांत २ कोटींचे उत्पन्न )
साता-यातही शुक्रवारी सकाळी २.८ मॅग्निट्यूडचा भूकंप झाला. साता-यासह कोल्हापूरच्या नजीकच्या परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले होते. मात्र याबाबत मशीनमध्ये नोंद झाली नसल्याचे पुणे येथील सेस्मॉलोजी विभागातील अधिका-यांनी सांगितले. त्यावेळी आमची मशीनही बंद होती, अशी अखेरीस कबुलीही दिली. शनिवारीही गडचिरोली जिल्हायातील सिरोंचा येथील भूकंपाची नोंदही सेस्मोलॉजी विभागाकडून झालेली नाही. या भागांतील भूकंपाचा केंद्रबिंदू उमानूर असल्याचे बोलले जात आहे. या भागांतील भूकंपाचे धक्के शेजारच्या तेलंगणा राज्याला लागून असलेल्या परिसरातही जाणवले. सातारा आणि गडचिरोली दोन्ही ठिकाणांमधील भूकंपाची तीव्रता कमी असल्याने लोकांनी घाबरु नये, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community