भारताची पहिली मानवी अंतराळ ‘गगनयान’ मोहिमेची पहिली चाचणी शनिवारी, २१ ऑक्टोबरला करण्यात येणार आहे. या चाचणी उड्डाणानंतर ३ चाचण्या पूर्ण होतील.
इस्त्रोकडून अंतराळवीरांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी ही उड्डाण चाचणी करण्यात येणार आहे. मिशन गगनयान टीव्ही डी १ ची उड्डाण चाचणी झाल्यानंतर गगनयान कार्यक्रमांतर्गत आणखी ३ परीक्षणं यानाचे मिशनही सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती इस्त्रोचे प्रमुख सोमनाथ यांनी दिली आहे.
(हेही वाचा –Mumbai Indians Sign Malinga : लसिथ मलिंगा मुंबई इंडियन्सचा नवा गोलंदाजी प्रशिक्षक)
ही गगनयान मोहिम ३ दिवसांची असणार आहे. या मोहिमेसाठी अंतराळ यानाला पृथ्वीच्या ४०० किमीच्या कक्षेत नेऊन सोडले जाणार आहे आणि पुन्हा सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणण्याचे इस्त्रोचे प्रमुख उद्दिष्ट असणार आहे.
Join Our WhatsApp Community