इस्त्रोकडून (ISRO) राबवण्यात आलेल्या भारताच्या पहिल्या मानवी ‘गगनयान’ मोहिमोची पहिली उड्डाण चाचणी (first flight test) २१ ऑक्टोबरला करण्यात येणार आहे. या उड्डाण चाचणीनंतर आणखी ३ चाचणी पूर्ण करण्यात येणार आहे.
शनिवारी, (२१ ऑक्टोबर) सकाळी ८ वाजता श्रीहरिकोटा (Sriharikota) येथील सतिश धवन अंतराळ केंद्रातून या गगनयान मोहिमेची पहिली मानवरहित उड्डाण चाचणी करण्यात येणार आहे. इस्त्रोकडून अंतराळवीरांच्या सुरक्षिततेतची खात्री करण्यासाठी ही उड्डाण चाचणी करण्यात येणार आहे. मिशन गगनयान टीव्ही डी १ची उड्डाण चाचणी झाल्यानंतर गगनयान कार्यक्रमानंतर आणखी ३ परीक्षणं यानाचे मिशन सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती इस्त्रोचे प्रमुख सोमनाथ यांनी मंगळवारी दिली आहे.
ही गगनयान मोहिम ३ दिवसांची असणार आहे. या मोहिमेसाठी अंतराळयानाला पृथ्वीच्या ४०० किमीच्या कक्षेत नेऊन सोडले जाणार आहे आणि पुन्हा सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणण्याचे इस्त्रोचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
स्पेसक्राप्ट कसे असेल? ( spacecraft )
-गगनयान मोहिमेची पहिली उड्डाण चाचणी यशस्वी झाली, तर उर्वरित पात्रता चाचण्या आणि मानवरहित मोहिमांचा टप्पा चांगल्या प्रकारे निश्चित करण्यास मदत होईल.
– गगनयान मोहिम २०२५मध्ये कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. यामध्ये क्रू इंटरफेस, लाईफ सपोर्ट सिस्टिम, एव्हीओनिक्स आणि डिसेलेरेशन सिस्टिम असणार आहे.
– अंतराळयान पृथ्वीवर आणणे आणि पृथ्वीवर आल्यानंतर ते समुद्रात सुरक्षितपणे उतरवणे, यासाठी यानाची खास रचना करण्यात आली आहे.
– क्रूच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आणि ते पुन्हा प्रवेश करण्यासाठी अंतराळयान खास पद्धतीने डिझाईन करण्यात आले आहे.