Meghna Kirtikar passed away: माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पत्नीचे निधन

150
Meghna Kirtikar passed away: माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पत्नीचे निधन
Meghna Kirtikar passed away: माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पत्नीचे निधन

शिवसेना नेते व माजी खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांच्‍या पत्‍नी मेघना गजानन (Meghna Kirtikar passed away) कीर्तिकर यांचे आज (५ जानेवारी) अल्पश: आजाराने निधन झाले. त्या ८२ वर्षांच्या होत्या. आज रविवारी ५ जानेवारी २०२५ रोजी पहाटे ३.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर गोरेगाव पूर्व मधील शिवधाम स्‍मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. (Meghna Kirtikar passed away)

हेही वाचा-Bandipora Army Accident : बांदीपोरामध्ये लष्कराच्या वाहनाला अपघात; तीन जवान हुतात्मा, दोन जखमी

गजानन कीर्तिकर यांच्या पत्नी मेघना कीर्तिकर या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर वांद्र्यातील लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज रविवारी 5 जानेवारी 2025 रोजी पहाटे ३.३० वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. (Meghna Kirtikar passed away)

हेही वाचा-Veer Savarkar: स्वार्थी खुलासे करण्याऐवजी सावरकरांचे साहित्यातील स्थान समजून घ्या!

मेघना कीर्तिकर यांचे पार्थिव संध्याकाळी 4 ते 6 या दरम्यान अंत्यदर्शनसाठी त्यांच्या गोरेगाव पूर्वमधील स्नेहदीप, पहाडी रोड नं. २ या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. यानंतर शिवधाम स्‍मशानभूमी, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व) या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्‍यसंस्‍कार होतील. (Meghna Kirtikar passed away)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.