गॅलेलियो गॅलिली यांचा जन्म १५ फेब्रुवारी १५६४ रोजी पिसा इटलीमध्ये जन्म झाला. त्यांचे वडील व्हिन्सेंझो गॅलीली, एक ल्युटेनिस्ट, संगीतकार आणि संगीत सिद्धांतकार होते. विशेष म्हणजे पुढे जाऊन गॅलिलियो स्वतः कुशल ल्युटेनिस्ट झाले. ल्युटेनिस्ट म्हणजे ल्यूट नावाचे वाद्य वाजवणारा कलाकार. (Galileo Galilei) गॅलिलियो एक इटालियन खगोलशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, अभियंता व गणितज्ञ होते.
गॅलिलियो यांना निरीक्षणात्मक खगोलशास्त्र, आधुनिक काळातील शास्त्रीय भौतिकशास्त्र, वैज्ञानिक पद्धती आणि आधुनिक विज्ञानाचे जनक म्हटले जाते. गॅलिलियो (Galileo Galilei) यांनी हायड्रोस्टॅटिक तराजू बनवला होता. त्या काळात अॅरिस्टॉटलच्या तत्त्वज्ञानाचा पगडा सर्वत्र निर्माण झाला होता. एखादा सिद्धान्त मांडायचा आणि केवळ वादविवाद करून तो प्रस्थापित करायचा अशी परंपरा तोपर्यंत होती. गॅलिलियो यांनी मात्र आपला सिद्धान्त प्रयोगाने सिद्ध करून दाखवायचा नवीनच पायंडा पाडला.
गॅलिलियो यांनी गती आणि वेग, गुरुत्वाकर्षण आणि फ्री फॉल, सापेक्षतेचा सिद्धांत, जडत्व, प्रक्षेपणणाची गती यांचा अभ्यास केला आणि पेंडुलम आणि “हायड्रोस्टॅटिक बॅलन्स” च्या गुणधर्मांचे वर्णन करून उपयोजित विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये देखील कार्य केले. विशेष म्हणजे पृथ्वीचे स्थान विश्वाच्या केंद्रात असल्याचा समज चुकीचा आहे हे त्याने गणिताद्वारे सिद्ध केले. त्यावेळी यावरुन बराच वादंग माजला होता. त्याचबरोबर त्यांनी वस्तूची प्रतिमा बत्तीस पट मोठी करून दाखविणारी दुर्बीण तयार केली. या दुर्बिणीमुळे अनेक अज्ञात ग्रह, तारे यांचे निरीक्षण करता आले. हा खगोलशास्त्रातील त्याकाळचा अद्भुत आणि महत्वाचा शोध मानला जातो.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community