Gallantry Award 2024: १०३ शौर्य पुरस्कार जाहीर, ४ कीर्ती आणि १८ शौर्य चक्र

205
Gallantry Award 2024: १०३ शौर्य पुरस्कार जाहीर, ४ कीर्ती आणि १८ शौर्य चक्र
Gallantry Award 2024: १०३ शौर्य पुरस्कार जाहीर, ४ कीर्ती आणि १८ शौर्य चक्र

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या (78th Independence Day) पूर्वसंध्येला बुधवार, १४ ऑगस्ट रोजी सशस्त्र दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) कर्मचाऱ्यांना १०३ शौर्य पुरस्कार मंजूर केले. ४  कीर्ती चक्रे आणि १८ शौर्य चक्रे आहेत. ९ पुरस्कार मरणोत्तर देण्यात आले. वायुसेनेच्या दोन शूर सैनिकांना शौर्य चक्र आणि ६ सैनिकांना वायु सेना पदक प्रदान करण्यात आले आहे. (Gallantry Award 2024)

शौर्य चक्र म्हणजे काय?

अशोक चक्र श्रेणी-III पुरस्कार ४ जानेवारी १९५२ रोजी सुरू झाला. नंतर २७ जानेवारी १९६७ रोजी त्यांचे नाव बदलून शौर्य चक्र ठेवण्यात आले. शौर्य चक्र लष्कर, नौदल आणि हवाई दल, कोणतेही राखीव दल, प्रादेशिक सेना आणि इतर कोणत्याही सशस्त्र दलाच्या सर्व श्रेणीतील अधिकाऱ्यांना दिले जाते. शौर्य चक्रात एक पदक दिले जाते आणि १५०० रुपये आर्थिक भत्ता म्हणून दिला जातो. (Gallantry Award 2024)

(हेही वाचा – independence day quotes : स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा; काय आहे स्वातंत्र्याचे महत्त्व?)

४ सैनिकांना कीर्ती चक्राने सन्मानित करण्यात आले
  1. कर्नल मनप्रीत सिंग, सेना पदक, शीख लाइट इन्फंट्री/19वी बटालियन राष्ट्रीय रायफल्स (मरणोत्तर)
  2. मेजर मल्ल राम गोपाल नायडू, मराठा लाइट इन्फंट्री/56 वी बटालियन राष्ट्रीय रायफल्स
  3. रायफलमन रवी कुमार, जम्मू आणि काश्मीर लाइट इन्फंट्री/63 वी बटालियन राष्ट्रीय रायफल्स (मरणोत्तर)
  4. पोलिस उपअधीक्षक हिमायून मुझम्मील भट, जम्मू आणि काश्मीर पोलिस, C/O 19 व्या बटालियन राष्ट्रीय रायफल्स (मरणोत्तर)
18 सैनिक ज्यांना शौर्य चक्र मिळाले
  1. कर्नल पवन सिंग, 666 आर्मी एव्हिएशन स्क्वाड्रन (R&O)
  2. मेजर सीव्हीएस निखिल, 21 व्या बटालियन पॅराशूट रेजिमेंट (विशेष दल)
  3. मेजर आशिष धोंचक, एसएम, शीख लाइट इन्फंट्री/19 वी बटालियन राष्ट्रीय रायफल्स (मरणोत्तर)
  4. मेजर त्रिपतप्रीत सिंग, आर्मी सर्व्हिस कॉर्प्स/34 वी बटालियन राष्ट्रीय रायफल्स
  5. मेजर साहिल रंधावा, रेजिमेंट आर्टिलरी/34 वी बटालियन राष्ट्रीय रायफल्स
  6. सुभेदार संजीव सिंग जसरोटिया, 5वी बटालियन जम्मू आणि काश्मीर रायफल्स
  7. नायब सुभेदार पी. पबिन सिंग, आर्टिलरी रेजिमेंट/56 वी बटालियन राष्ट्रीय रायफल्स
  8. शिपाई प्रदीप सिंग, शीख लाइट इन्फंट्री/19वी बटालियन राष्ट्रीय रायफल्स (मरणोत्तर)
  9. SPO अब्दुल लतीफ, जम्मू आणि काश्मीर पोलिस C/O 33 वी बटालियन राष्ट्रीय रायफल्स
  10. कॅप्टन शरद सिन्सुनवाल (04823-के), कमांडिंग ऑफिसर INS कोलकाता
  11. लेफ्टनंट कमांडर कपिल यादव (44003-F), AEO INS विशाखापट्टणम
  12. विंग कमांडर व्हर्नन डेसमंड केन (31215), फ्लाइंग (पायलट)
  13. स्क्वाड्रन लीडर दीपक कुमार (32754), फ्लाइंग (पायलट)
  14. पवन कुमार, सीटी/जीडी, सीआरपीएफ (मरणोत्तर)
  15. देवन सी, सीटी/जीडी, सीआरपीएफ (मरणोत्तर)
  16. लखवीर, डेप्युटी कमांडंट, CRPF MHA
  17. राजेश पांचाळ, AC, CRPF MHA
  18. मलकित सिंग, CT/GD, CRPF MHA

(हेही  वाचा – Hawkers Policy : नगर पथविक्रेता समिती निवडणूक; ४३ इच्‍छुक उमेदवारांनी घेतला सहभाग)

हवाई दलात शौर्य चक्र प्राप्त दोन सैनिक
  1. व्हर्नन डेसमंड कीन व्हीएम, विंग कमांडर
    विंग कमांडर व्हर्नन डेसमंड केन व्हीएम सध्या फायटर स्क्वॉड्रनमध्ये तैनात आहेत. 24 जुलै 2023 रोजी, जग्वार फायटर जेटने त्यांना खराबीचे संकेत दिले. दरम्यान, 2500 फूट उंचीवर उजव्या इंजिनमध्येही बिघाड झाला. विमान पटकन उत्तर प्रदेशातील गोरखपूर शहराजवळ पोहोचले. एका इंजिनच्या साहाय्याने वैमानिकाने विमान नियंत्रित केले आणि ते वस्ती नसलेल्या भागाकडे वळवले. त्यामुळे मोठा अपघात टळला.
  2. दीपक कुमार, स्क्वाड्रन लीडर
    स्क्वॉड्रन लीडर दीपक कुमार सध्या एअरफोर्स स्टेशन हकिमपेट येथे तैनात आहेत. 25 ऑगस्ट 2023 रोजी उड्डाण करताना त्यांच्या विमानाला पक्ष धडकला आणि इंजिनला आग लागली. त्यांनी लगेचच विमान उतरवण्याचा निर्णय घेतला. रात्री मर्यादित सिग्नल असूनही, त्यांनी आपल्या बुद्धीचा वापर करून लहान धावपट्टीवर विमान जबरदस्तीने उतरवले.
वायु सेना पदक (शौर्य) प्राप्त 6 सैनिक
  1. जसप्रीत सिंग संधू, विंग कमांडर
  2. अक्षय अरुण महाले, विंग कमांडर
  3. आनंद विनायक आगाशे, विंग कमांडर
  4. महिपालसिंग राठोड, स्क्वॉड्रन लीडर
  5. विकास राघव, कनिष्ठ वॉरंट अधिकारी
  6. अश्वनी कुमार, फ्लाइट गनर

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.