Gaming Zone Fire : राजकोट अग्निकांड प्रकरणात न्यायालयाने मागितले पालिकेकडे स्पष्टीकरण!

161
Gaming Zone Fire : राजकोट अग्निकांड प्रकरणात न्यायालयाने मागितले पालिकेकडे स्पष्टीकरण!
Gaming Zone Fire : राजकोट अग्निकांड प्रकरणात न्यायालयाने मागितले पालिकेकडे स्पष्टीकरण!

गुजरातमधील राजकोटच्या टीआरपी गेमिंग झोनमध्ये (Gaming Zone Fire) शनिवारी (25 मे) रात्री भीषण आग लागली होती. नाना मौवा रोडवर टीआरपी गेमिंग झोन असलेल्या खाजगी मालकीच्या दुमजली इमारतीत ही आग लागली होती. यात नऊ लहान मुलांसह किमान २७ लोकांचा यात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी रात्री उशीरा एसआयटी स्थापन करुन चौकशीचे आदेश देखील देण्यात आले आहेत. (Gaming Zone Fire)

गेमिंग झोनचा सार्वजनिक सुरक्षेला धोका

याप्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायाधीश बीरेन वैष्णव आणि देवेन देसाई यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. यावर न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले आहे की, ‘ही मानवनिर्मित आपत्ती आहे.’ या घटनेत लहान मुलांना जीव गमावावा लागल्याने उच्च न्यायालयाने या घटनेची दखल घेतली आहे. (Gaming Zone Fire)गेमिंग झोनच्या निर्माणात आणि संचालनात योग्य नियमांचे पालन केले गेले नाही. यासोबतच अहमदाबाद मध्ये सिंधुभवन रोड, सरदार पटेल रिंग रोड आणि एसजी हायवे वरील गेमिंग झोनचा सार्वजनिक सुरक्षेला धोका आहे. उच्च न्यायालयाने यासंदर्भात अहमदाबाद, वडोदरा, सूरत आणि राजकोट नगरच्या पालिका प्रशासनाकडून स्पष्टीकरण सुद्धा मागितले आहे. (Gaming Zone Fire)

(हेही वाचा –Sanjay Raut: आघाडीमध्ये पुन्हा बिघाडी! “भान ठेवून बोलावं…”, ठाकरे संजय राऊतांवर संतापले)

न्यायालयाने आपल्या सुनावणीत पुढे म्हटले की, कायद्यातील कोणत्या तरतुदीनुसार या गेमिंग झोनला चालवण्याची परवानगी दिली गेली होती? तसेच उच्च न्यायालयाने आदेश दिले की, संबंधित पालिका प्रशासनाने यांदर्भातील माहिती एका दिवसात द्यावी. यासोबतच न्यायालयाने अग्निसुरक्षेतील नियम पालनासंदर्भात देखील स्पष्टीकरण मागवले आहे. तर या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी २७ मे ला होणार आहे. (Gaming Zone Fire)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.