Mumbaiमध्ये लागले गणपती बाप्पाच्या आगमनाचे बोर्ड, ‘ही’ तारीख लक्षात ठेवा; सोशल मीडियावर व्हायरल Videoपहा

१० दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची ख्याती संपूर्ण भारतभर पाहायला मिळते.

155
Mumbaiमध्ये लागले गणपती बाप्पाच्या आगमनाचे बोर्ड, 'ही' तारीख लक्षात ठेवा; सोशल मीडियावर व्हायरल Videoपहा

लहान-मोठ्यांसह सगळेच बाप्पाच्या आगमनासाठी आतूर झालेले असतात. दरवर्षी गणेशोत्सव देशात मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. या दिवसाला गणेश चतुर्थी किंवा विनायक चतुर्थी असेही म्हणतात. १० दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची ख्याती संपूर्ण भारतभर पाहायला मिळते. २०२४ला गणपती बाप्पा कधी आपल्या घरी विराजमान होणार आहेत हे तुम्हाला माहितीये का ? यावेळी बाप्पा यायच्या काही महिने आधीच रस्त्यावर बाप्पाच्या आगमानाच्या तारखांच्या पाट्या लावल्या आहेत. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

२०२४मध्ये कधी होणार आगमन 
मुंबईच्या रस्त्यावर यावर्षी बाप्पाचं आगमन कधी होणार आहे याची तारखेसकट माहिती दिली आहे. हा बोर्ड रस्त्याच्या कडेला लावला असून यावर ”Save the date 7th september 2024 गणपत्ती बाप्पा मोरया” असं लिहिलं आहे, तर हिंदू दिनदर्शिकेनुसार २०२४ मध्ये बाप्पा सप्टेंबरच्या सुरुवातीला आपल्या घरी येतील. ७ सप्टेंबरला बाप्पाचे आगामन होईल तर १७ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असेल.

व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल
हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सर्वांनाच आता बाप्पाच्या आगमनाची ओढ लागली आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर mumbai_ganesh_chaturthi नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून गणेशभक्त मोठ्या प्रमाणात व्हिडीओवर प्रतिक्रिया देत आहेत. “आतुरता तुझ्या आगमनाची” “गणपती बाप्पा मोरया ” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.