Ganapati Special ST Bus 2024: कोकणवासीयांना गणपती बाप्पा पावला! एसटी महामंडळ ४३०० ज्यादा गाड्या सोडणार

246
Ganapati Special ST Bus 2024: कोकणवासीयांना गणपती बाप्पा पावला! एसटी महामंडळ ४३०० ज्यादा गाड्या सोडणार
Ganapati Special ST Bus 2024: कोकणवासीयांना गणपती बाप्पा पावला! एसटी महामंडळ ४३०० ज्यादा गाड्या सोडणार

येत्या ७ सप्टेंबर २०२४ रोजी श्री गणरायाचे आगमन (Ganpati Aagman 2024) होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ ही सज्ज झाले आहे. मुंबईत राहणाऱ्या कोकणातील चाकरमान्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान ४३०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना (Amrit Senior Citizen Scheme) १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे.   (Ganapati Special ST Bus 2024)

(हेही वाचा – UPSC Chairman : प्रीती सुदान यूपीएससीच्या नव्या अध्यक्ष)

कोकणातल्या चाकरमान्यांचा जिव्हाळ्याचा विषय

गणपती उत्सव म्हणजे कोकणातल्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. कोकणातील गणपती बाप्पा, चाकरमानी व एसटी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी ही धावत असते. यंदा सुमारे ४३०० जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील. सदर बसेस आरक्षणासाठी npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या असून, सदर बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation ॲपव्दारे उपलब्ध होणार आहे.

(हेही वाचा – लेफ्टनंट जनरल Sadhana Saxena Nair यांच्याकडे महासंचालक पदाची जबाबदारी, १ ऑगस्टला स्वीकारणार पदभार)

ठिकठिकाणी वाहनदुरूस्ती पथक स्थापन होणार

गणेशोत्सवादरम्यान, एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत. असे एसटी महामंडळाचे जनसंपर्क प्रमुख अभिजीत भोसले यांनी कळवले. (Ganapati Special ST Bus 2024)

हेही पाहा –

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.