Ganpati : बाप्पाने ऐकले, पुढच्या वर्षी लवकर येणार…

147

११ दिवस गणपती (Ganpati) बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर गुरुवारी, २८ सप्टेंबर रोजी गणेशभक्तांनी आपापल्या बाप्पाला निरोप दिला. नेहमीप्रमाणे बाप्पाला निरोप देताना त्याला आर्जव केली, आता जातोस पण पुढच्या वर्षी लवकर ये…बाप्पाने गणेशभक्तांची ही विनंती ऐकली. पुढच्या वर्षी २०२४ मध्ये बाप्पा यंदाच्या वर्षीच्या तुलनेत ११ दिवस लवकर येणार आहे. पुढच्या वर्षी गणेश चतुर्थी ७ सप्टेंबर २०२४ रोजी आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nityanand Bhise (@bhisenityanand)

गुरुवारी श्री गणेशाला (Ganpati) भक्तिभावाने निरोप देण्यात आला. लालबागचा राजाचे विसर्जन तब्बल २० तासांची मिरवणूक काढल्यानंतर करण्यात आले. पुण्यातील विसर्जन मिरवणूक मात्र दरवर्षीप्रमाणेच २९ तास सुरु राहिली. घरोघरीच्या गणपतींचे सुरळीत विसर्जन झाले. यंदाच्या गणेशोत्सवात भक्तीचा महापूर आला तो सोशल मीडियामध्ये. गणेश चतुर्थीच्या आधी महिनाभरापासूनच फेसबुक आणि इंस्टावर बाप्पाच्या आगमनाचा किती ओढ लागली आहे, त्यासंबंधीच्या रिल्सने अगदी वातावरण निर्मिती केली, त्यानंतर ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला…’ या गाण्याच्या रिल्सने तर लहानांपासून थोर मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच मने जिंकली. गणपतीची आरती, गणपतीचे स्रोत, ढोल ताश्यांचे संगीत अशा विविध गाण्यांचे सिलेक्शन करून गणेशभक्तांनी आपापल्या बाप्पाचे सोशल मीडियावरून दर्शन घडवून आणले.

(हेही वाचा Lalbagh Raja Visarjan : ‘लालबागचा राजा’ विसर्जन सोहळ्यात चोरट्यांची कमाई)

मात्र गणपती (Ganpati) बाप्पाला जेव्हा  निरोप देण्याच्या रिल्स तयार करण्यात आल्या तेव्हा त्यासाठी सिलेक्शन करण्यात आलेली गाणी मात्र अनेकांच्या मनाचा ठाव घेत राहिली, ‘निरोप घेतो आता आज्ञा असावी…’, ‘आम्ही तुझी लेकरे तूच दे आमची साथ, तुझ्या कृपेने होऊ दे प्रेमाची बरसात’, ‘ही समिंदराची लाट देवा पाहते तुमची वाट, ढोल ताशाच्या या गजरात देव निघाले थाटामाटात’, ‘विसर्जनाला देवा तुझ्या रे डोळे हे भरतात पाण्याने, सागर सारा उसळून हसतो रूप तुझे पाहून’, ‘परतून जाऊ नका तुम्ही तुमच्या गावी मजला न भरले नाही अजून का तुम्हाला घाई’ अशा विविध गाण्यांनी गणेशभक्तांनी आपापल्या बाप्पाला निरोप देतानाचे रिल्स सगळ्यांच्या पसंतीस पडले. अशातच ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशी विनंती यातील प्रत्येक जणांची होती. ही विनंती बाप्पाने ऐकली आणि पुढच्या वर्षी बाप्पाचे आगमन लवकर होणार आहे. यंदाच्या वर्षाच्या तुलनेत ११ दिवस आधीच बाप्पा घरोघरी येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.