आज भाद्रपद शुक्ल चतुर्थी ! आजपासून गणेशोत्सवाच्या आनंदमय पर्वाला आरंभ झाला आहे. (Ganesh Festival) गेले अनेक दिवस भक्त ज्यांची आतुरतेने वाट पाहत होते, ते गणराय आज राज्यात घरोघरी विराजमान झाले आहेत. राज्यात सर्वत्र भक्तीमय वातावरण दिसून येत आहे. घरोघरी ऐकू येणाऱ्या आरत्या, चौकाचौकात लावलेली गणेश भक्तिपर गीते, सार्वजनिक मंडळाची चालू असलेली लगबग आणि मंगलमूर्ती मोरयाचा गजर यांचा सर्वत्र उत्साह दिसून येत आहे. अष्टविनायक, राज्यातील जागृत श्री गणेश मंदिरे, प्रसिद्ध गणेशोत्सव मांडले या ठिकाणी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शन रांगा लावल्या आहेत.
(हेही वाचा – Ganeshotsav 2023 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे गणेशोत्सवाविषयीचे विचार !)
लालबागच्या राजासह अन्य प्रमुख मंडळांत पहाटे प्राणप्रतिष्ठा
मुंबईतील सर्वात प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाची पहाटे 5 वाजता प्राणप्रतिष्ठा झाली. विधीवत पूजा झाल्यानंतर आता दर्शन रांग खुली करण्यात आली आहे. यंदा या ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळ्याचा आकर्षक देखावा करण्यात आला आहे. चिंचपोकळीच्या चिंतामणीची प्रतिष्ठापना झाली आहे. त्याआधीच मुखदर्शनासाठी पहाटे पाच वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. यासह अन्य प्रमुख मंडळांमध्ये गणरायाची उत्साहपूर्ण वातावरणात प्रतिष्ठापना झाली आहे. (Ganesh Festival)
पुण्यातही मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीला आरंभ
गणेशोत्सवासाठी पुणे सज्ज झालं आहे. सगळीकडे बाप्पाच्या स्वागतासाठी रस्त्यांवर रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या आहेत. ढोल ताशा पथकेदेखील मिरवणूक गाजवायला सज्ज झाले झाले आहे. पुण्यातील मानाच्या गणपतीच्या मिरवणूक पाहण्यासाठी अनेक पुणेकर लक्ष्मी रस्ता आणि बाजीराव रस्त्यांवर एकत्र यायला सुरुवात झाली आहे. गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषात आणि ढोल ताशांच्या गजरात पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्राणप्रतिष्ठापनेसाठी सकाळी साडेआठ वाजता मुख्य मंदिरापासून श्री हनुमान रथातून श्रींची मिरवणूक निघाली. रितीरिवाजानुसार आणि धर्मपरंपरेनुसार आकर्षक फुलांच्या श्री हनुमानाच्या चार मूर्ती रथावर मिरवणूक काढण्यात सुरु झाली आहे. कोतवाली चावडी येथील पारंपारिक जागेत श्रीराम मंदिर अयोध्या या प्रतिकृती बाप्पा विराजमान होतील सकाळी दहा वाजून 23 मिनिटांनी सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना होणार आहे. (Ganesh Festival)
कोकणात लाडक्या बाप्पांचे आगमन
कोकणातील सर्वात मोठ्या उत्सवाला आजपासून सुरुवात झाली. कोकणात घरोघरी गणपती बाप्पाची आज प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. कोणी शेतीच्या बांधावरून डोक्यावर बाप्पांची मूर्ती घेऊन येत आहेत, तर कोणी होडी मध्ये बाप्पांची मूर्ती ठेवून खाडी, नदी पार करून आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जात आहेत. सिंधुदुर्गात 71,798 घरांत बाप्पांचे आगमन होत असून मोठ्या भक्तिभावाने बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना केली जात आहे. (Ganesh Festival)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community