-
विशेष प्रतिनिधी,मुंबई
मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील १३ पूल धोकादायक स्वरुपाचे असून, काही पुलांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. शिवाय, काही पुलांची कामे पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार असल्यामुळे गणेशभक्तांनी श्रीगणेशाचे आगमन-विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान या पुलांवरून जाताना काळजी घ्यावी. याबाबत मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलीस यांच्या वतीने वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सूचना व निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. (Ganesh Chaturthi 2024)
या १३ पुलांवर एकावेळेस अधिक वजन होणार नाही, याची काळजी घ्यावी. या पुलांवर ध्वनीक्षेपकाचा वापर करुन नाचगाणी करण्यात येऊ नये. उत्सवाचा आनंद पुलावरुन खाली आल्यावर घ्यावा. पुलावर एका वेळेस भाविकांची जास्त गर्दी न करता, पुलावर जास्त वेळ न थांबता त्वरित पुलावरुन पुढे जावे, पोलीस व मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या सुचनेनुसार मार्गक्रमण करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. (Ganesh Chaturthi 2024)
(हेही वाचा – चर्चेची वेळ संपली, कोणत्याही प्रकारे प्रतिक्रिया देऊ; परराष्ट्रमंत्री S Jaishankar यांनी पाकिस्तानला सुनावले)
या अतिधोकादायक पुलावर राहणार आगमन आणि विसर्जन मार्गावर बंदी
मध्य रेल्वे
घाटकोपर रेल्वे ओव्हर ब्रिज,
करी रोड रेल्वे ओव्हर ब्रिज,
आर्थर रोड रेल्वे ओव्हर ब्रिज किंवा चिंचपोकळी रेल्वे ओव्हर ब्रिज,
भायखळा रेल्वे ओव्हर ब्रिज,
शीव (सायन) स्टेशन रेल्वे ओव्हर ब्रिज
(हेही वाचा – स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करूनही ते माफी मागत नाहीत; PM Narendra Modi यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल)
पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वे मार्गावरील मरीन लाईन्स रेल्वे ओव्हर ब्रिज,
सँडहर्स्ट रोड रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये),
फ्रेंच रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये),
केनडी रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये),
फॉकलॅन्ड रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व मुंबई सेंट्रलच्या मध्ये),
महालक्ष्मी स्टेशन रेल्वे ओव्हर ब्रिज,
प्रभादेवी–कॅरोल रेल्वे ओव्हर ब्रिज
दादर लोकमान्य टिळक रेल्वे ओव्हर ब्रिज
हेही पहा –
Join Our WhatsApp Community