Ganeshotsav 2024 : राजधानीत गणेश उत्सवाची धूम; विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन

130
Ganeshotsav 2024 : राजधानीत गणेश उत्सवाची धूम; विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन
  • प्रतिनिधी 

देशाच्या राजधानीमध्ये गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी विविध प्रांतातील मराठी भाषिक एकत्र येऊन गणपती बाप्पाच्या निनादात मग्न झालेले दिसून येत आहेत. तर दिल्लीमध्ये असलेली महाराष्ट्रीयन सोसायटी पश्चिम विहार येथील आनंदवन सोसायटी मध्ये १० दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. छोट्या मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केला होता. शिवाय आनंद मेला, अंताक्षरी, फॅन्सी ड्रेस, शास्त्रीय सांगित अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. छोट्यांपासून तर मोठे देखील उत्साहात कार्यक्रमात सहभागी झाले होते. तर काही सार्वजनिक मंडळे देखील दरवर्षी गणेशाची स्थापना करतात. (Ganeshotsav 2024)

प्रत्येक मंडळांचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे. दिल्ली आणि एनसीआर द्वारका, फरिदाबाद, नोएडा येथील काही मंडळांतून विधिवत गणेश स्थापना, प्राणप्रतिष्ठा, आरती कार्यक्रम आणि मिरवणूक विसर्जन हे सारे उत्साहाने पार पडते. दिल्ली मध्येच नव्हे तर एनसीआर मध्ये देखील वेगवेगळ्या मंडळातून कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी विविध मंडळ तयार करण्यात आली आहे. या सगळ्याच मंडळातून महाराष्ट्रातील लोकधारा, दर्जेदार मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल, स्थानिक उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची तळमळ दिसून येते. तर काही मंडळांचा अस्सल महाराष्ट्रीयन चवीचा ‘महाप्रसाद’ दिल्लीपासून ते थेट त्याच्या गावातील गल्लीपर्यंतच्या गणेश मंडळांची आठवण ‘मराठी माणूस’ला करून देतो. याशिवाय संस्कृतीचे आदान-प्रदान होऊन नॉन महाराष्ट्रीयनांनाही बोटं चाखत महाप्रसादातील व्यंजनांची कृती जाणून पदार्थ करून बघण्यास उद्युक्त करतो. (Ganeshotsav 2024)

(हेही वाचा – अजितदादा गटामुळे BJP ला २० जागांचा तोटा; जागावाटपात ‘या’ महत्त्वाच्या जागा सोडाव्या लागणार ?)

पूर्व दिल्ली येथील आनंदविहारचे पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ अनेकांना गणेशाची आरती करण्यासाठी निमंत्रण देते. दक्षिण दिल्लीत सार्वजनिक उत्सव समिती दरवर्षी दिल्ली हाट आयएनए येथे पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करते. या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील गाजलेली नाटकांची मेजवानी दिल्लीकर मराठी रसिकांना देणे. यावर्षी प्रसिद्ध कलाकार प्रशांत दामले यांच्या ‘गेला माधव कुणीकडे’ या नाटकाचे आयोजन केले आहे. मध्य दिल्लीत एकूण पाच गणपतींची स्थापना होते. विशेषतः चांदणी चौक या मुस्लिम बहुल भागात हा गणेशोत्सव (Ganeshotsav 2024) पार पडतो. महाराष्ट्रातून येऊन करोल बाग मध्ये राहत असलेले ज्वेलर्स आणि कारागीर दोन मंडळांतून गणेशोत्सव साजरा करतात. हा सुवर्णकार समाज सांगली, सातारा भागातील आहे. इथे घरगुती वातावरणातील पारंपरिक हळदी-कुंकूचे आयोजन असते. याच मध्यवर्ती दिल्लीत फैज रोडवर मराठा मित्र मंडळातर्फे चौगुले पब्लिक स्कूल ही शाळा येथे देखील गणेशोत्सव उत्सहात साजरा करण्यात येतो. (Ganeshotsav 2024)

तसेच पहाडगंज येथे बृहन्महाराष्ट्र भवन आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या गरजूंकरिता माफक दरात निवासाची येथे सोय होते. येथेही बाप्पांची स्थापना केली जाते. येथील वैशिष्ट्य ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, हुशार होतकरू विद्यार्थ्यांना पुरस्कार दिला जातो. मध्यवर्ती दिल्लीतील ल्युटन्स झोन येथील नॉर्थ ब्लॉकमध्ये माय होम इंडियाचे सुनील देवधर यांच्या घरी दहा दिवस ‘समरसता’ बाप्पांचे ला आगमन होते. गणोशोत्सवानिमित्त आयोजित आरास देखावा, चित्रकला-हस्त शिल्पकलेत उत्स्फूर्तपणे मराठी सहभागी होऊन आकर्षक गणपतीची मूर्ती चित्रे कृतीचे तयार करतात. पहाडगंज येथे बृहन्महाराष्ट्र भवन आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या गरजूंकरिता माफक दरात निवासाची येथे सोय होते. येथेही बाप्पांची स्थापना केली जाते. येथील वैशिष्ट्य पूर्वांचल ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, हुशार होतकरू करते. विद्यार्थ्यांना पुरस्कार दिला जातो. जुन्या महाराष्ट्र सदनातील हिरवळीवर वाजतगाजत दहा दिवसांकरिता गणपती बाप्पा विराजमान होतो. इथल्या महाप्रसादाचा लाभ घेण्यास दिल्लीभरातून भाविक येतात. इथे महाराष्ट्रातील लोकधारा, वाद्य झांज पथक यांच्या सादरीकरणाने मंडी हाऊस येथील परिसर दुमदुमून जातो. आयटी हब असलेल्या गुरुग्राममधील सार्वजनिक गणेशोत्सव समिती नेहमीच अग्रेसर असते. यंदा प्रथमेश लघाटे-मुग्धा वैशंपायन यांची गाण्याची मैफल गुरुग्राम मध्ये आयोजित करण्यात आली होती. (Ganeshotsav 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.