राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचे मंगलमय वातावरण आहे. (Ganesh Festival) देशभरातही गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. सर्वजण गणरायाचे स्वागत करण्यासाठी सर्व सज्ज झाले आहेत. पंतप्रधान मोदींनीही एक्स (ट्विटर) च्या ध्यमातून सर्व देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे मोदींनी या शुभेच्छा मराठीतून दिल्या आहेत.
(हेही वाचा – Parliament Special Session : आजपासून नवीन संसद भवनात कामकाजाला प्रारंभ होणार; जुन्या संसदेसमोर सर्व खासदारांचे फोटोसेशन)
‘सर्व देशवासियांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया !’ असे नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. यासोबत त्यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरातील त्यांचा जुना फोटो देखील पोस्ट केला आहे. (Ganesh Festival)
सर्व देशवासीयांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया! pic.twitter.com/iaDSrS0JyA
— Narendra Modi (@narendramodi) September 19, 2023
मराठीसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसरे आणखी एक ट्विट करत देशातील सर्व नागरिकांना हिंदीमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘देशभरातील माझ्या कुटुंबीयांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. विघ्नहर्ता-विनायकाचा हा उत्सव तुम्हा सर्वांच्या जीवनात सौभाग्य, यश आणि संपन्नता घेऊन येवो. गणपती बाप्पा मोरया ! अशा आशयाच्या शुभेच्छा पंतप्रधानांनी दिल्या आहेत.’ (Ganesh Festival)
देशभर के मेरे परिवारजनों को गणेश चतुर्थी की मंगलकामनाएं। विघ्नहर्ता-विनायक की उपासना से जुड़ा यह पावन उत्सव आप सभी के जीवन में सौभाग्य, सफलता और संपन्नता लेकर आए। गणपति बाप्पा मोरया! pic.twitter.com/h3u3ltDcVH
— Narendra Modi (@narendramodi) September 19, 2023
गणेशोत्सावाच्या पार्श्वभूमीवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. आजच्या मुहुर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व खासदार नवीन इमारतीमध्ये प्रवेश करणार आहेत, तर दुसरीकडे देशभरात गणेश उत्सवाचा आनंद आहे. (Ganesh Festival)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community