वाजत गाजत बाप्पा निघाले. . .

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, अशाप्रकारे जयघोष करत मुंबईतील गणेश भक्तांनी दहा दिवसांच्या बाप्पांना निरोप दिला. ढोल ताशांच्या गजरात. . . गुलाल उधळत श्री गणरायांच्या विसर्जन मिरवणुका चौपाटींसह विसर्जनाच्या स्थळांच्या दिशेने सरकत होत्या. त्यामुळे बाप्पांच्या निघालेल्या मिरवणुका पाहण्यासाठी अनेक विसर्जन मार्गांच्या दोन्ही बाजूंना नागरिकांनी एकच मोठी गर्दी केली होती. कोविड नंतर प्रथमच निर्बंधमुक्त उत्सव होत असल्याने चौपाटीवर भाविकांसह पर्यटकांनी एकच गर्दी जमलेली पाहायला मिळत होती. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मुंबईतील विविध ठिकाणच्या विसर्जन स्थळांवर एकूण ७,३४८ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले होते.

( हेही वाचा : विसर्जनासाठी दोन्ही मार्गावर १८ विशेष लोकल गाड्या)

दुपारी ०३ वाजेपर्यंत मुंबईतील गिरगाव, दादर, जुहू चौपट्यांसह नैसर्गिक व कृत्रिम तलावांच्या विसर्जन स्थळी ४२ सार्वजनिक गणेशमूर्तींचे आणि २१०४ घरगुती गणेशमूर्तींचे आणि १४ गौरींचे अशाप्रकारे अशा एकूण २१६० मूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते.

अनंत चतुर्दशीच्या अर्थात गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी होणाऱ्या विसर्जनाच्यादृष्टीकोनातून अनेक वाहतूकीचे मार्ग बंद करण्यात आले आहेत, तर धोकादायक उड्डाणपुलांवरुन मिरवणूका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. काही छोट्या गणेशोत्सव सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुका या दुपारीच निघाल्या. संध्याकाळी मोठ्या उत्सव मंडळांच्या गणेश मूर्तींच्या मिरवणुकांमुळे होणारी गर्दी लक्षात घेता छोट्या मंडळांनी दुपारी आपल्या बाप्पाला निरोप देत विसर्जन केले. मात्र, संध्याकाळी पाचनंतर मुंबईतील अनेक रस्त्यांवर बाप्पांच्या विसर्जन मिरवणुका पाहायला मिळत होत्या. त्यामुळे प्रत्येक रस्ता आणि विसर्जन मार्गाकडे जाणारे रस्ते गर्दीने व्यापून गेले होते.

गणरायांच्या मूर्तींचे विसर्जन

दुपारी १२ वाजेपर्यंत . . .

मुंबईत दुपारी १२ वाजेपर्यंत सहा दिवसांच्या एकूण ४६७ गणेशमूर्तीं व ५ गौरींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये, सार्वजनिक ६ सार्वजनिक गणेशमूर्तींचा व ४६१ घरगुती गणेशमूर्तींचा समावेश आहे.

कृत्रिम तलावातील विसर्जन :
  • एकूण ११८ गणेशमूर्तींचे विसर्जन
  • १ सार्वजनिक तर ११७ घरगुती मूर्तींचा समावेश. तसेच,५ गौरींचेही विसर्जन

मुंबईत दुपारी ३ वाजेपर्यंत . . .

सहा दिवसांच्या एकूण २,१४६ गणेशमूर्तीं व १४ गौरींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये, सार्वजनिक ४२ सार्वजनिक गणेशमूर्तींचा व २,१०४ घरगुती गणेशमूर्तींचा समावेश

कृत्रिम तलाव विसर्जन :
  • एकूण ६२४ गणेशमूर्तींचे विसर्जन. . .
  • ७ सार्वजनिक तर ६१७ घरगुती मूर्तींचा समावेश. . . तसेच,१० गौरींचे विसर्जन

६ वाजेपर्यंत

सहा दिवसांच्या एकूण ७,३४८गणेशमूर्तीं व ७३गौरींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये, सार्वजनिक ३०२ सार्वजनिक गणेशमूर्तींचा व ७०४६ घरगुती गणेशमूर्तींचा समावेश

कृत्रिम तलाव विसर्जन :

एकूण २४८२गणेशमूर्तींचे विसर्जन. . .

५३ सार्वजनिक तर २३९४ घरगुती मूर्तींचा समावेश. . . तसेच,३५ गौरींचे विसर्जन

रात्री ९ वाजेपर्यंत

सहा दिवसांच्या एकूण १९,००५गणेशमूर्तीं व १७३गौरींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये, सार्वजनिक ११२८ सार्वजनिक गणेशमूर्तींचा व १७,८७६ घरगुती गणेशमूर्तींचा समावेश

कृत्रिम तलाव विसर्जन :

एकूण ६४०० विसर्जन. . .

१९८ सार्वजनिक तर ६१४३ घरगुती मूर्तींचा समावेश. . . तसेच,५९ गौरींचे विसर्जन…

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here