गणेशोत्सवाला अवघा एक महिना राहीला असून सर्व गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारखान्यांमध्ये बाप्पाची मूर्ती घडवण्याची लगबग वाढली आहे. परंतू, यावर्षी मूर्ती घडवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याने गणेशमूर्तींच्या किंमतीत ३० टक्क्यांनी वाढ होऊ शकते.
पेणनंतर नंदुरबारच्या गणेशमूर्तींना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते. गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या विविध भागांत नंदुरबारमधून गणेश मूर्ती निर्यात केल्या जातात. मूर्तिकार नारायण वाघ यांनी सांगितले, गणेश मूर्तीच्या उंचीवरील निर्बंध सरकारने उठवल्याने सार्वजनिक मंडळाच्या वतीने मोठमोठ्या गणेश मूर्तींच्या मागणी वाढ झाली आहे.
(हेही वाचा – Padma Awards : पद्म पुरस्कारांसाठी नावांची शिफारस करणाऱ्या समितीची स्थापना, मुनगंटीवार अध्यक्षपदी)
पीओपी मूर्तींच्या नियमांबाबत मोठा दिलासा
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पीओपीला पर्याय सुचवण्याबाबतची मार्गदर्शक तत्व अद्यापही जाहीर करण्यात आलेली नसल्याने ४ फुटांवरील गणेश मूर्तींसाठी पीओपीचा वापर करता येणार आहे. मात्र, चार फुटांपेक्षा कमी उंच मूर्तींसाठी शाडूची माती बंधनकारक असणार आहे. दरम्यान, मूर्तीकार आणि मूर्ती विक्रेते साठवणूकदारांना ‘एक खिडकी’ पद्धतीने ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community