गणेश विसर्जन मिरवणूक, सार्वजनिक ठिकाणी पार्किंगची विशेष व्यवस्था

135

गणेशोत्सवात दर्शनासोबतच देखावे पाहण्यासाठी आणि गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात नागरिक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे या कालावधीमध्ये नागरिकांच्या वाहनांसाठी महापालिकेकडील शाळा, महाविद्यालयांचे पार्किंग आणि सार्वजनिक ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहने या नियोजित पार्किंगमध्येच लावावीत, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

( हेही वाचा : सरकारी शाळांचे सक्षमीकरण, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणावर भर देणार – मुख्यमंत्री)

पुण्यात अशी असेल पार्किंग व्यवस्था 

(४ ते ८ सप्टेंबरपर्यंत) : हमालवाडा वाहनतळ – नारायणपेठ, गोगटे प्रशाला- केळकर रस्ता, एस. पी. कॉलेज- टिळक रस्ता, बालगंधर्व रंगमंदिर वाहनतळ- जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना वाहनतळ- झेड ब्रिजजवळ, मिलेनियम प्लाझा वाहनतळ- एफ. सी. रस्ता, लँडमार्क वाहनतळ- शिरोळे रस्ता, प्रो. मे. यश एंटरप्रायझेस- एफ. सी. रस्ता, सर्कस मैदान, न्यू इंग्लिश स्कूल- रमणबाग, टिळक पूल ते भिडे पूल- नदी पात्रात, बालभवनासमोर- सारसबाग रस्ता बजाज पुतळा ते सणस पुतळा चौक उजवी बाजू, गाडगीळ पुतळा ते कुंभारवेस चौक, देसाई कॉलेज- शनिवारवाडा (पोलिस वाहनांकरिता), काँग्रेस भवन- मनपा रस्ता, मंगला टॉकीज, पूरम चौक ते हॉटेल विश्व- रस्त्याच्या डाव्या बाजूस.

गणेशोत्सव विसर्जनादरम्यान (९ ते १० सप्टेंबर) : संजीवनी हॉस्पिटल- कर्वे रस्ता, गरवारे कॉलेज- कर्वे रस्ता, डेक्कन एज्युकेशन सोसायटी- टिळक रस्ता, काँग्रेस भवन- मनपा रस्ता, मनपा भवन पार्किंग, सीओईपी मैदान, मंगला टॉकीज, हमालवाडा वाहनतळ- नारायणपेठ, जयंतराव टिळक पूल ते भिडे पूल-नदीपात्रातील रस्ता, आपटे प्रशाला- आपटे रस्ता, देसाई कॉलेज- शनिवारवाडा (पोलिस वाहनांकरिता), बीएमसीसी कॉलेज- बीएमसीसी रस्ता, फर्ग्युसन कॉलेज, पूरम चौक ते हॉटेल विश्व- रस्त्याच्या डाव्या बाजूस, आयएलएस लॉ कॉलेज- लॉ कॉलेज रस्ता,न्यू इंग्लिश स्कूल- टिळक रस्ता, गाडगीळ पुतळा ते कुंभारवेस, जैन हॉस्टेल- बीएमसीसी रस्ता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.