अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी (Ganesh Visarjan 2023) मुंबई पोलीस दल सज्ज झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे. मुंबईतील रस्त्यावर २० हजार पोलिसांच्या फौजफाट्यासह राज्यराखीव दलाच्या तुकड्या, गृहरक्षक दल, महाराष्ट्र सुरक्षा दल आणि नागरिक सुरक्षा दल तैनात करण्यात येणार आहे. दरम्यान विसर्जनाच्या दिवशी मुंबईतील वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांकडून काही रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.
‘हे’ रस्ते वाहतुकीसाठी बंद असतील …
चिंचपोकळी जंक्शन ते गॅस कंपनी, भोईवाडा नाका ते हिंदमाता जंक्शन, (Ganesh Visarjan 2023) केईएम रोड, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, रानडे रोड, संत ज्ञानेश्वर मंदिर रोड, जांभेकर महाराज मार्ग, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, वाळकेश्वर रस्ता, पंडिता रमाबाई मार्ग, जगन्नाथ शंकरशेठ मार्ग, एम.एस.अली मार्ग, पठ्ठे बापूराव मार्ग, ताडदेव मार्ग, जहांगीर बोमण बेहराम मार्ग, एन. एम. जोशी मार्ग, बी. जे मार्ग, मिर्झा गालीब मार्ग, मौलाना आझाद रोड, बेलासिस रोड, केळूस्कर रोड दक्षिण मार्ग, टिळक उड्डाण पूल हे रस्ते विसर्जन मिरवणुकीमुळे बंद राहतील.
(हेही वाचा – Monsoon Update : बाप्पाला निरोप देण्यासाठी पाऊसही सज्ज; मुंबईसह ३ जिल्ह्यांना यलो अलर्ट)
राजाराम मोहन रॉय मार्ग, कावसजी पटेल टँक रोड, संत सेना मार्ग, (Ganesh Visarjan 2023) नानुभाऊ देसाई रोड, सरदार वल्लभभाई पटेल रोड, दादासाहेब भडकमकर मार्ग, ६० फिट रोड, माहिम सायन लिंक रोड, टी. एच. कटारिया मार्ग, माटुंगा लेबर कॅम्प रोड, एल. बी. एस. रस्ता, न्यु मिल रोड, संत रोहिदास मार्ग, नाथालाल पारेख मार्ग, कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग, रामभाऊ साळगावकर मार्ग, सीएसएमटी जंक्शन ते मेट्रो जंक्शन, जे. एस. एस. रोड, विठ्ठलभाई पटेल मार्ग, बाबासाहेब जयकर मार्ग,मौलाना शौकत अली रोड, डॉ. बी. ए. रोड या रस्त्यांवर विसर्जन मिरवणुका निघणार असल्याने हे रस्ते ही बंद ठेवण्यात येणार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community