Ganesh Visarjan 2024 : गौरी गणपतींना भावपूर्ण निरोप

118
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर,  हा असा  जयघोष करत ढोल ताशांच्या गजरात गुरुवारी गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप (Ganesh Visarjan 2024) दिला.  ढोलताशांचा तालावर आणि डी.जे च्या गाण्यावर नाचत भक्तांनी बाप्पाचा निरोप घेताना पुढच्या वर्षी लवकर येण्याची आर्जवी केली. मात्र, पाच दिवसांच्या  गणेशमूर्तींचे विसर्जन बुधवारीच झाल्याने गुरुवारी गौरी गणपती मूर्तीचे विसर्जन करताना मोठी गर्दी दिसून आली नाही. विशेष म्हणजे महापालिका प्रशासनाने यंदा  नागरिकांना घराशेजारी २०४ कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिल्याने हे गर्दीचे प्रमाण कमी  दिसून आल्याचे बोलले जात आहे.

ganapati 3

मागील सहा दिवसांचा लाडू, मोदकांसह पंचपंक्वांनांचा पाहुणचार घेत घराघरांत विराजमान झालेल्या बाप्पांनी तसेच माहेरला आलेल्या गौरीने गुरुवारी निरोप (Ganesh Visarjan 2024) घेतला. श्री गणरायाच्या आगमनापासून अधूनमधून संततधार कोसळणाऱ्या पावसानेही गौरी विसर्जनाच्या दिवशी काहीशी विश्रांती घेतल्याने  भक्तांना मनसोक्त  नाचत, गुलाल उधळत बाप्पाचा जय जयकार करत आपल्या बप्पाला निरोप देता आला. यंदा पाच दिवसाच्या गणपतीचे विसर्जन बुधवारीच झाल्यामुळे गौरी गणपतीच्या विसर्जनातील  रस्ते काहीशे मोकळे मिळाले, त्यामुळे बाप्पाच्या मिरवणुका गणेश भक्तांना मोकळेपणाने काढता आल्या. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत  कुणी समुद्र तसेच तलावात  या नैसर्गिक विसर्जन स्थळी तर काही भक्तांनी कृत्रिम तलावात गणेश मूर्तीचे विसर्जन करत आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप दिला.

श्री गणेश मूर्तींचे विसर्जन करण्‍यासाठी मुंबईत ६९ नैसर्गिक स्थळी गणेश मूर्तींच्या विसर्जनाची (Ganesh Visarjan 2024) व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय मुंबईतील विविध ठिकाणी २०४ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व विसर्जन स्थळांवर महापालिकेच्यावतीने गणेश भक्तांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे.

(हेही वाचा राहुल गांधींचा आरक्षणविरोधी चेहरा उघड; अमेरिकेतील वक्तव्याचा Devendra Fadnavis यांनी घेतला समाचार)

गुरुवारी रात्री नऊ वाजेपर्यंत एकूण  २४,७५७ गणेश मूर्ती व गौरींचे विसर्जन (Ganesh Visarjan 2024) पार पडले. त्यामध्ये सार्वजनिक ६२, घरगुती २१,००६ आणि गौरी ३,६८९ आदी मूर्तींचा समावेश होता. तर मुंबईतील २०४ कृत्रिम तलावांतील विसर्जन स्थळांवर एकूण ११,१२२ गणेश मूर्ती आणि गौरींचे विसर्जन पार पडले. त्यामध्ये सार्वजनिक ३१, घरगुती  ९,५६४ आणि गौरी १,५२७ आदी  मूर्तींचा समावेश होता. त्यामुळे एकूण गणेश मूर्ती विसर्जनाच्या सरासरी  ४० ते  ४२ टक्के गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करण्यावर भाविकांचा भर होता, हे या आकडेवारींवरून स्पष्ट होत आहे.

रात्री ९ वाजेपर्यंत झालेले गणेश मूर्ती, गौरींचे विसर्जन

नैसर्गिक स्त्रोत 

  • सार्वजनिक: ६२
  • घरगुती : २१, ००६
  • गौरी  : ३, ६८९
  • एकूण मूर्ती : २४,७५७

कृत्रिम तलाव

  • सार्वजनिक :३१
  • घरगुती : ९५६४
  • गौरी : १५२७
  • एकूण मूर्ती : ११,१२२

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.