Ganesh Visarjan Boat Accident : वर्सोवा येथे अंधेरीच्या राजाच्या विसर्जनावेळी उलटली बोट

271
Ganesh Visarjan Boat Accident : वर्सोवा येथे अंधेरीच्या राजाच्या विसर्जनावेळी उलटली बोट
Ganesh Visarjan Boat Accident : वर्सोवा येथे अंधेरीच्या राजाच्या विसर्जनावेळी उलटली बोट

रविवारी (२२ सप्टेंबर) मुंबईतील वर्सोवा बीचवर अंधेरीच्या राजाचे (Andhericha Raja) विसर्जन चालू होते. दरम्यान, अचानक बोट उलटल्याने काही कामगार व गणेशभक्त पाण्यात पडले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवारी सकाळी अकरा वाजता मूर्तीचे विसर्जन सुरू होते. त्यानंतर बोट उलटली.  (Ganesh Visarjan Boat Accident)

२४ हून अधिक गणेशभक्त पाण्याखाली

बोट उलटताच गोंधळ उडाला. या बोटीतील २४ हून अधिक लोक समुद्राच्या लाटांमध्ये अडकले. पाण्यात बुडालेल्या लोकांना तेथे उपस्थित कोळी बांधवांनी वाचवण्यास सुरुवात केली. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहीती अद्याप मिळालेली नाही. 

(हेही वाचा – चुकून जरी गोळी आली, तर आम्ही…Amit Shah यांचा पाकिस्तानला इशारा)

मूर्ती विसर्जनाच्या वेळी दगडफेक केल्याप्रकरणी ४ जणांवर गुन्हा दाखल

दुसरीकडे, महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे १८ सप्टेंबर रोजी गणेश मूर्ती विसर्जन (Stone pelting of Ganesh Visarjan in Bhiwandi) यात्रेदरम्यान झालेल्या दगडफेकीप्रकरणी चार अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की,  विसर्जनाच्या दिवशी मध्यरात्रीनंतर वंजारपट्टी नाका परिसरातील श्री हनुमान सार्वजनिक मित्र मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली, त्यामुळे मूर्तीची मोडतोड झाली आणि तणाव निर्माण झाला. 

या कलमान्वये गुन्हा दाखल

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या आरोपींवर भारतीय न्यायिक संहितेच्या कलम २९८ (कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने प्रार्थनास्थळाचे नुकसान करणे किंवा अपवित्र करणे), १२५ (इतरांच्या जीवाला किंवा वैयक्तिक सुरक्षेला धोका निर्माण करणारे कृत्य) आणि ३२४ अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. (४) (दुर्घटना) असे कलम लावण्यात आले आहेत. 

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.