गणेशोत्सव कालावधीत मिठाई उत्पादक व हॉटेल व्यावसायिकांना दक्षता घेण्याचे आवाहन

156

सणासुदीच्या कालावधीमध्ये लोकांकडून मिठाई व इतर अन्न पदार्थ जसे खवा मावा, तूप, रवा, मैदा, खाद्यतेल इत्यादीची मागणी मोठ्या प्रमाणात केली जाते. यामुळेच मिठाई उत्पादक/ विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांना दक्षता घेण्याचे आवाहन अन्न औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) लक्ष्मण दराडे यांनी केले आहे.

मिठाई व्यावसायिकांना विशेष सूचना

मिठाई उत्पादनाचा परिसर हा पर्यावरणीय दृष्टीने किटकापासून संरक्षित व स्वच्छ असावा, पदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा, तयार अन्न पदार्थ हे स्वच्छ व सुरक्षित ठिकाणीच व्यवस्थित झाकून ठेवावेत, आजारी व्यक्तीने अन्न पदार्थ हाताळू नयेत, मिठाई तयार करताना केवळ फूडग्रेड खाद्यरंगाचा अत्यल्प प्रमाणात वापर करावा (100 PPM पेक्षा कमी), बंगाली मिठाई ही 24 तासांच्या आत खाण्याबाबत ग्राहकांना स्पष्ट निर्देश देण्यात यावेत.

मिठाई बनवणाऱ्या व्यक्तींनी नेहमी डोक्यावर टोपी, मास्क, हातमोजे व स्वच्छ ॲप्रन वापरावेत, मिठाईवर वापरला जाणारा सोनेरी व चांदीचा वर्ख योग्य दर्जाचे व उच्च प्रतीचे असावे, मिठाई हाताळताना हात वारंवार स्वच्छ धुवावे, विक्री बिलावर अन्न परवाना क्रमांक नमूद करण्यात यावा, त्याचप्रमाणे विक्रीसाठी सुट्या स्वरुपातील भारतीय मिठाईच्या ट्रेवर “बेस्ट बिफोर डेट” नमूद करण्यात यावी. मुदतबाह्य अन्न पदार्थांचा कोणत्याही परिस्थितीत साठा व विक्री करू नये. रायगड जिल्ह्यातील मिठाई उत्पादक, विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांनी या सर्व सूचनांचे पालन करावे असे आवाहन अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त लक्ष्मण दराडे यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.