राज्यातील विविध भागातील गणेशोत्सवाचे त्याचे त्याचे वैशिष्ट्य आहे. मुंबईतील गणेशोत्सव म्हटले की, उंचच उंच गणेशमूर्ती! या उंच गणेशमूर्ती पाहण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक मुंबईत येत असतात. यामध्ये खेतवाडीतील १६ गल्ल्यांतील गणेशोत्सवाच्या मूर्ती विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. या गणेशमूर्ती कशा आणि किती दिवसांत बनवल्या जातात, या सगळ्यांसाठीच उत्सुकतेचा विषय असतो.
कशा प्रकारे उभ्या केल्या गणेशमूर्ती?
मागील काही वर्षांपासून गणेशोत्सवासाठी गणेशमूर्तींच्या उंचीवर निर्बंध घातले होते. सार्वजनिक गणेशोत्सवाची मूर्ती ५ फुटापर्यंत असावी, असे निर्बंध घालण्यात आले होते. मात्र शिंदे-फडणवीस सरकारने यंदाच्या गणेशोत्सवासाठी गणेशमूर्तीवरील उंचीवरील निर्बंध हटवले आहेत. मात्र हे निर्बंध केवळ महिनाभराआधीच हटवण्यात आले आहेत. त्यानंतर या मंडळांनी १५ ते ३० फूट उंचीच्या मूर्तींच्या ऑर्डर दिल्या आहेत. या मूर्ती चक्क ८ ते १५ दिवसांत उभ्या करण्यात आल्या आहेत. यंदाच्या वर्षी काही तुरळक गणेशमूर्ती उभ्या आहेत, बाकी बहुतेक मूर्ती बैठ्या स्वरूपातील आहेत. त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी खाली आधार आहे. या गणेशमूर्ती बनवण्यासाठी गणेशमूर्ती कारखान्यातून मूर्तीचे अवयव मंडपात आणण्यात आले, ते जोडून या मूर्ती तयार करण्यात आल्या. यातील बहुतेक मूर्ती मंडपात जागेवरच उभारण्यात आल्या आहेत.
(हेही वाचा अशोक चव्हाण-फडणवीसांच्या गाठीभेटी आणि राणेंचे सूतोवाच)
Join Our WhatsApp Community