Ganeshotsav 2023 : मुंबईतील गणेशोत्सवाची क्रेझ गुजरातमध्येही ,रोज येतायेत ६०ते ७० बसेस

मुंबईतील गणेशोत्सव म्हणजे छोटी सहलच झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

119
Ganeshotsav 2024 : मुंबईत आतापर्यंत १२३७ मूर्तिकारांकडून मंडप परवानगीसाठी अर्ज

लालबागच्या राजाची महती सातासमुद्रा पार आहेच. मग याच्या दर्शनासाठी महाराष्ट्रा शेजारील गुजरात कसे मागे राहील. यासाठीच गुजरातमधुन दररोज गणेशोत्सवाच्या काळात लाखो लोक मुंबईत दाखल होत आहेत. शिवाय २४ तासांच्या आत संपूर्ण मुंबई दर्शनच होत आहे. त्यामुळे मुंबईतील गणेशोत्सव म्हणजे छोटी सहलच झाल्याचे पाहावयास मिळत आहे.(Ganeshotsav 2023)

गुजरातमधून येणाऱ्या भाविकांची संख्या करोनाकाळानंतर लक्षणीय प्रमाणात वाढल्याचे पालघर जिल्ह्यातील वाहतूक विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. छोट्या-मोठ्या आरामबस तसेच खासगी वाहनांतून शेकडो भाविक एका दिवसासाठी मुंबईत येतात. वापी, सिल्वासा, दमण, चिखली, वलसाड, नवसारी आणि सुरत येथून येणाऱ्या भविकांची संख्या अधिक आहे. खासगी टुर एजन्सीमार्फत सहलींसाठी प्रत्येकी एक ते दीड हजार रुपये आकारले जातात. याशिवाय कौटुंबिक किंवा मित्रमंडळींचा समूह बनवून त्याद्वारे बस भाडेतत्त्वावर घेऊन मुंबई गाठण्याकडेही कल आहे. (Ganeshotsav 2023)

(हेही वाचा : Central Railway : अनंत चतुर्दशीच्या दिवशी मध्य रेल्वेवर १० विशेष लोकल)

गुजरातमधून केवळ गणेशदर्शनासाठी नऊ दिवसात आल्या ५०० बसेस

या बसगाड्या मध्यरात्री एकाच वेळेस निघत असल्याने मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळते आहे. खासगी टुर एजन्सीमार्फत सहलींसाठी प्रत्येकी एक ते दीड हजार रुपये आकारले जातात.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.