गणेशोत्सवाला आता अवघ्या दोनच दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे बहुतांश चाकरमानींची कोकणात जाण्याकरिता लगबग सुरू झाली आहे. काही जण तर केव्हाच कोकणात पोहोचले आहेत, मात्र कोकणच्या दिशेने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांच्या स्वागताची अनोखी शक्कल जिल्हा प्रशासन विभागाच्या वतीने लढवण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासन कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालं आहे. यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आलं आहे. स्वागत कक्षाजवळ जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग आणि पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी कोकणात आलेल्या चाकरमान्यांना गुलाबाचं फूल देऊन त्यांचं स्वागत केलं आहे. अनपेक्षितपणे आणि अनोख्या पद्धतीने केलेल्या या स्वागतामुळे कोकणात गणेशोत्सवाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या चाकरमान्यांना यामुळे सुखद धक्का बसला.
Join Our WhatsApp Community