- विशेष प्रतिनिधी, मुंबई
श्री गणरायांचे आगमन येत्या शनिवारी होत असून दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन हे येत्या रविवारी होणार आहे. त्यामुळे घरोघरी आगमन होणाऱ्या दीड दिवसांच्या गणपतीसह अनंत चतुर्दशीपर्यंतच्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. यासाठी यंदा नैसर्गिक विसर्जन स्थळांसह कृत्रिम तलावांच्या ठिकाणी महापालिकेने व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. यंदा ६९ नैसर्गिक विसर्जन स्थळांसह २०४ कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १३ कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्यात आली आहे. (Ganeshotsav 2024)
मुंबईमध्ये शनिवारी मोठ्या भक्ती भावाने श्री गणरायांचे आगमन घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये होणार आहे. त्यामुळे पुढील अकरा दिवस या गणेशोत्सवामुळे भक्तीचे मंत्रमृग्ध करणारे वातावर मुंबईसह राज्यात पहायला मिळणार आहे. श्री गणरायांचे आगमन झाल्यानंतर दीड दिवसांपासून पाच, गौरीगणपती, सात दिवस, नऊ दिवस तसेच अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पांची सेवा मनोभाव भक्तांकडून करून बाप्पाला निरोप दिला जातो.
(हेही वाचा – Ganesh Utsav 2024 : गणेशोत्सवातील पावित्र्य आणि धर्मजागृतीसाठी शंभराहून अधिक गणेश मंडळ आली एकत्र)
त्यामुळे बाप्पांच्या या मुर्तीच्या विसर्जनासाठी महापालिकेच्यावतीने विसर्जन स्थळांवर विविध प्रकारची सुविध उपलब्ध करून दिली आहे. मुंबईतील ६९ नैसर्गिक विसर्जन स्थळांसह यावर्षी २०४ ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात आली आहे. मागील वर्षी कृत्रिम तलावांची संख्या १९१ एवढी होती, ती संख्या यंदा २०४ एवढी करण्यात येत असून विभाग स्तरावर फिरती विसर्जन स्थळे तथा श्री गणेश मूर्ती संकलन केंद्रेही तयार करण्यात आली आहे. त्यामुळे ही संख्या २२० ते २३० पर्यंत जाईल असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केली. (Ganeshotsav 2024)
मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाचे समन्वय असलेल्या उपायुक्त प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील नैसर्गिक आणि कृत्रिम तलावांच्या ठिकाणी गणेश भक्तांसाठ विसर्जनाची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली आहे विसर्जनाच्या ठिकाणी महापालिका तसेच अनेक स्वयंसेवी संस्थामार्फत वैद्यकीय सेवा, पिण्याचे पाणी, शौचालये, आपत्कालिन व्यवस्था इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
(हेही वाचा – Ganeshotsav 2024 : मुंबई पोलिसांना गणेशोत्सव काळात सतर्क राहण्याचे आदेश)
सन २०२३ मध्ये कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन केलेल्या गणेश मूर्तींची संख्या
सार्वजनिक गणेश मूर्ती : १९०२
घरगुती गणेश मूर्ती : ७२,२४०
गौरी मूर्ती : २, ५६५
एकूण गणेश मूर्ती आणि गौरी मूर्ती : ७६,७०६
(हेही वाचा – आक्रमक मुसलमानांना शांत करण्यासाठी हिंदु युवकाला मृत घोषित करावे लागले; Bangladesh पोलिसांचे स्पष्टीकरण)
दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन
भरती : दुपारी २.२८, भरतीची उंची ३.७५ मीटर
ओहोटी : रात्री ०८.२४, ओहोटीची उची ०.९७ मीटर (Ganeshotsav 2024)
कृत्रिम तलाव कुठल्या भागात आहेत वाचा –
हेही पहा –
Join Our WhatsApp Community