Ganeshotsav 2024 : ‘मरे’च्या गणपती उत्सवासाठी २२ विशेष रात्रीच्या उपनगरीय गाड्या

61
Ganeshotsav 2024 : 'मरे'च्या गणपती उत्सवासाठी २२ विशेष रात्रीच्या उपनगरीय गाड्या
Ganeshotsav 2024 : 'मरे'च्या गणपती उत्सवासाठी २२ विशेष रात्रीच्या उपनगरीय गाड्या

मध्य रेल्वे दि. १४/ १५.०९.२०२४ (शनि/रवि रात्र), दि. १५/ १६.०९.२०२४ (रवि/सोमवार रात्र) आणि दि. १७ / १८.०९.२०२४ (मंगळ/बुध रात्री) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि कल्याण दरम्यानच्या मुख्य मार्गावर. गणपती उत्सवादरम्यान प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण/ठाणे आणि परतीच्या प्रवास साठी या २२ विशेष रात्रीच्या उपनगरीय गाड्या चालवणार आहे. हार्बर लाइनवर विशेष उपनगरीय गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल आणि परत गणपती विसर्जनाच्या दिवशी दि. १७/१८.०९.२०२४ रोजी (मंगळ/बुध रात्री) चालतील. खाली दिलेल्या वेळेनुसार, विशेष गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि कल्याण/ठाणे/पनवेल दरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील.  (Ganeshotsav 2024)

(हेही वाचा- Jammu and Kashmir : बारामुला येथे 3 दहशतवादी ठार)

डाउन मेन लाइनवर (दि. १४/१५.०९.२०२४; दि. १५/१६.०९.२०२४ आणि दि. १७/१८.०९.२०२४ रोजी) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -कल्याण विशेष १ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०१.४० वाजता सुटेल आणि कल्याण येथे ०३.१० वाजता पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -ठाणे विशेष १ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०२.३० वाजता सुटेल आणि ठाणे येथे ०३.३० वाजता पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -कल्याण विशेष १ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०३.२५ वाजता सुटेल आणि कल्याण येथे ०४.५५ वाजता पोहोचेल. UP मेन लाइनवर (दि. १४/१५.०९.२०२४; दि. १५/दि. १६.०९.२०२४ आणि दि. १७/दि. १८.०९.२०२४ रोजी) कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष २ कल्याण येथून ००:०५ वाजता सुटेल आणि ०१.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.  (Ganeshotsav 2024)

(हेही वाचा- रेल्वेमंत्री Ashwini Vaishnav यांनी केला लोकलने प्रवास; म्हणाले, मुंबईकरांचा प्रवास सुसह्य करणार)

ठाणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष २ ठाणे येथून ०१.०० वाजता सुटेल आणि ०२.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल. ठाणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष ४ ठाणे येथून ०२.०० वाजता सुटेल आणि ०३.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल. डाऊन हार्बर लाईनवर (फक्त दि. १७/१८.०९.२०२४ रोजी) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल विशेष १ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०१.३० वाजता सुटेल आणि पनवेल येथे ०२.५० वाजता पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल विशेष ३ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०२.४५ वाजता सुटेल आणि पनवेल येथे ०४.०५ वाजता पोहोचेल. अप हार्बर लाईनवर (फक्त दि. १७/१८.०९.२०२४ रोजी) पनवेल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष २ पनवेल येथून ०१.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ०२.२० वाजता पोहोचेल. पनवेल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष ४ पनवेल येथून ०१.४५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ०३.०५ वाजता पोहोचेल. प्रवाशांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी या गणपती उत्सव विशेष उपनगरीय रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा.  (Ganeshotsav 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.