Ganeshotsav 2024 : मुंबई महापालिकेच्यावतीने पर्यावरणपूरक गणपतीसाठी एक पाऊल पुढे, ६११ टन शाडू मातीचे वाटप

404
Ganeshotsav 2024 : मुंबई महापालिकेच्यावतीने पर्यावरणपूरक गणपतीसाठी एक पाऊल पुढे, ६११ टन शाडू मातीचे वाटप
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईत पर्यावरणपूरक श्री गणेशोत्सव (Ganeshotsav 2024) साजरा करण्यासाठी महापालिकेच्या पुढाकार घेतला असून शाडू मातीपासून पर्यावरणपूरक मूर्ती बनवण्यासाठी शाडू माती मोफत उपलब्ध करून दिली आहे. या शाडू मातीसाठी मूर्तीकारांची मागणी वाढली आहे. मागील वर्षी ४०० टन शाडू माती मूर्तीकारांना उपलब्ध दिल्यानंतर या वर्षी ६११ टन शाडू माती उपलब्ध करून दिली आहे. ही शाडू माती मोफत उपलब्ध करून दिल्यामुळे मुंबईतील तब्बल ६० हजारांहून अधिक गणेश मूर्ती या पर्यावरणपूरक बनल्या गेल्या आहेत. मागील वर्षीपासून सुरु केलेला हा महापालिकेचा प्रयत्न आता महापालिकेचे ध्येय साकार करताना दिसत आहे.

मुंबईत पर्यावरणपूरक अशा शाडू मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्ती बनवल्या जाव्यात यासाठी मागील वर्षीपासून महापालिकेने मूर्तीकारांना शाडू माती मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मागील वर्षी ४०० टन शाडू माती देण्यात आली होती. परंतु या गणेशोत्सवापूर्वी (Ganeshotsav 2024) गणेश मूर्तीकारांनी यावर्षी अधिक माती देण्याची मागणी केली. त्यानुसार, यावर्षी २०० पेक्षा अधिक मूर्तीकारांना ६११ टन शाडू माती महापालिकेने मोफत उपलब्ध करून दिल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचा – Haryana मध्ये काँग्रेस – आप आघाडीत फूट; ‘आप’ने जाहीर केली २० उमेदवारांची यादी)

मूर्तीकारांनी शाडू मातीची केली अधिकची मागणी

महापालिकेच्या ७ परिमंडळांमध्ये मूर्तीकारांना माती उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करून दिली होती, यासाठी प्रत्येक परिमंडळांना प्रत्येकी २० लाख रुपयांची तरतूद करून दिली होती. त्यानुसार, ही माती उपलब्ध करून दिली असून या शाडू मातीमुळे सुमारे ६० हजार गणेश मूर्ती बनवल्या गेल्याचा अंदाज आहे. टप्प्याटप्प्याने आता मूर्तीकार शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनवण्यास प्रोत्साहित होत असून मुंबईतील सर्व सर्व घरगुती गणेश मूर्ती बनवण्यासाठी सुमारे २० हजार टन पर्यंत माती महापालिकेला उपलब्ध करून द्यावी लागणार आहे, यासाठी महापालिकेची तयारी असल्याचेही महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (Ganeshotsav 2024)

पर्यावरण पुरक गणेश मूर्ती बनवण्यासाठी शाडू मातीचा वापर करण्यास मूर्तीकार अनुत्सुक होते. त्यामुळे महापालिकेने मार्केटिंग फंडा वापरत ही माती उपलब्ध करून देत त्यांना या मातीपासून मूर्ती बनवण्यास आणि भक्तांना शाडू मातीपासून बनवलेली मूर्ती घेण्यास प्रवृत्त करण्यास सुरुवात केली. त्यामुळे कालांतराने सर्व भक्त शाडू मातीपासून बनवलेल्या मूर्तीची मागणी करतील आणि मूर्तीकारही माती उपलब्ध होत असल्याने अशा पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवतील, जेणेकरून काही वर्षांत प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवल्या जाणाऱ्या मूर्ती बंद होऊन शाडू मातीच्या मूर्तींचे पूजन होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यंदा ६११ टन शाडू माती उपलब्ध करून दिली असली तरी प्रत्यक्षात मूर्तीकारांनी अधिकची मागणी केली असती तरी आम्ही त्याची व्यवस्था करून ठेवण्याच्या सूचना यापूर्वीच करून ठेवली होती. पण त्यांची खरेदी केली नव्हती. त्यामुळे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार सध्या शाडू माती देण्यात येत असली तरी जे जे मूर्तीकार शाडू मातीची मागणी करतात त्यांना ही माती उपलब्ध करून दिली जात आहे, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (Ganeshotsav 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.