Ganeshotsav 2024 : पुण्यात गणेशोत्सवात गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई

127
Ganeshotsav 2024 : पुण्यात गणेशोत्सवात गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई

गणेशोत्सवात भाविकांकडील मोबाइल संच, दागिने, रोकड, तसेच गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. सराइतांना पकडल्यानंतर त्यांना लष्कर पोलीस ठाण्यात सुरू करण्यात आलेल्या ‘डिटेंशन सेंटर’मध्ये ठेवण्यात येणार आहे. अशा प्रकारची स्वतंत्र व्यवस्था पहिल्यांदाच सुरू करण्यात आली आहे. (Ganeshotsav 2024)

(हेही वाचा – BMC : महानगरपालिकेच्या लिपिक पदासाठी ‘हे’ उमेदवारही करू शकतात अर्ज, ‘ती’ जाचक अट केली रद्द)

पुणे पोलिसांच्या फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या आवारातील कोठडीत (लाॅक अप) गंभीर गुन्हे करणाऱ्या आरोपींना ठेवण्यात येते. उत्सवात गैरप्रकार करणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे त्यांना स्थानबद्ध करण्यासाठी केंद्र सुरू करण्यात आले आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. उत्सवाच्या काळात किरकोळ स्वरूपाचे गुन्हे घडतात. (Ganeshotsav 2024)

(हेही वाचा – बदलापूरच्या घटनेनंतर राज्यातील आश्रमशाळांमध्ये CCTV बसवण्याचा सरकारचा आदेश; त्यासाठी बनवली कार्यपद्धत)

भाविकांकडील दागिने, मोबाइल, चोरी करणाऱ्या चोरट्यांना फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात येते. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या आवारातील कोठडीत क्षमतेपेक्षा जास्त आरोपी असतात. त्यामुळे लष्कर पोलीस ठाण्याच्या आवारातील कोठडीत स्थानबद्ध केलेल्या सराइतांना ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी नमूद केले. (Ganeshotsav 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.