-
विशेष प्रतिनिधी,मुंबई
माझगावचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अखिल अंजीरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे ७६ वे वर्ष असून मागील अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त मोठ्यास्वरुपात सजावाट करणाऱ्या या मडळाने यंदा मात्र खर्चात हात आखडता घेतल्याचे दिसून येत आहे. या मंडळाच्यावतीने बाप्पांच्या मूर्ती प्रतिष्ठापना करता उभारलेल्या मंडपाचे क्षेत्रफळच कमी आहे. शिवाय आजवरच्या गणेशोत्सवाच्या तुलनेत आतील देखावा मंडळाच्या नाव किर्तीला शोभणार नाही. केवळ राजमहलाची प्रतिकृती उभारुन त्यात बाप्पाला विराजमान केले आहे. मराठा आरक्षणाला या मंडळाचे अध्यक्ष छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विरोध केल्याने येथील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी या मंडळाकडे पाठ फिरवल्याने यंदाचा उत्सव थोडक्यात आटोपून घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. (Ganeshotsav 2024)
माझगाव येथील अखिल अंजीरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची स्थापना १९४९ झाली असून या मंडळाचे अध्यक्ष हे राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) असून सरचिटणीस समीर भुजबळ (Sameer Bhujbal) हे आहेत. या मंडळांच्या उत्सवाची संपूर्ण जबाबदारी ही छगन भुजबळ आणि समीर भुजबळ हेच घेत असतात. त्यामुळे मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमांची रुपरेषा तसेच सजावट ठरताना भुजबळ हे स्वत: जातीने लख घालत असतात. मागील वर्षी या मंडळाचा अमृत महोत्सवी वर्ष होते, त्यामुळे मोठ्या दिमाखात आगळी वेगळी सजावट आणि मोठा मंडप उभारण्यात आला होता. (Ganeshotsav 2024)
(हेही वाचा – Ramdas Athawale : जो पर्यंत सूर्य चंद्र आहे तो पर्यंत संविधान राहील)
दरवर्षी मंडळाचा मंडप हा मोठ्या आकाराचा असतो. परंतु यंदा या मंडळाने बांधलेला बांधलेला मंडप दरवर्षीच्या तुलनेत निम्मा आहे. त्यातच आकर्षक सजावट न करता राजमहालाचा किरकोळ देखावा उभारला आहे. दरवर्षीच्या तुलनेत अत्यंत साधेपणाने यंदाचा उत्सव साजरा होत असल्याने स्थानिकांसह इतर भाविकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. (Ganeshotsav 2024)
काहींच्या म्हणण्यानुसार, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी यांनी मराठा आरक्षण आणि हे आरक्षण मिळवून देण्यासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांना उघडपणे विरोध केला आहे. त्यांचा परिणाम उत्सव मंडळाच्या कामावर झाला असून अनेक मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी यातून माघार घेतल्याने मंडळाला यंदा मोठी सजावट करून मोठा उत्सव करता आलेला नाही. मराठा समाजातील लोकांनी पाठ फिरवल्याने मंडळाला यंदा खर्चाचा हात आखडता घ्यावा लागला. विशेष म्हणजे दरवेळी मंडळाचे पदाधिकारी हे प्रत्येक सजावटीच्या कामांकडे जातीन लक्ष देत असतात. परंतु यंदा हा लक्ष न दिल्याने मंडळाचे प्रवेशद्वारे असलेल्या आणि मंडळाचे नाव असलेल्या जागचा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा थर आणि त्यावरील रंग निघून जात आतील प्लायवूड दिसून येत आहे. त्यामुळे सजावटीचे कामही योग्यप्रकारे केले नसल्याचे दिसून येत आहे. (Ganeshotsav 2024)
(हेही वाचा – Bhaichung Bhutia : भारतीय फुटबॉल असोसिएशन बरखास्त करण्याची मागणी बायचुंग भुतिया का करतोय?)
तर काहींच्या म्हणण्यानुसार, मंडळाच्या मंडपाचे काम गणेशोत्सवापूर्वी खूप दिवस आधीपासून केले जाते. परंतु मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून यंदा गणपतीला काही दिवस आधी असताना हे काम सुरु केले. त्यामुळे सजावटीला पुरेसा कालावधी मिळाला नाही. त्यामुळे हा प्रकार झाला असेल. (Ganeshotsav 2024)
तर काहींच्या म्हणण्यानुसार, छगन भुजबळ, समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ हे आगामी विधानसभेची तयारी करत असून या निवडणुकीत होणारा खर्च लक्षात घेता या मंडळाच्या खर्चात त्यांनी हात आखडता घेतल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे या मंडळाच्यावतीने आयोजित उत्सवात अनंत चतुर्दशीपर्यंत रात्री मुलांची खाण्यापिण्याची मोठी चंगळ व्हायची, तेही यंदा बंद केल्याने मुलांमध्ये मोठा निरुत्साह पहायला मिळत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community