Ganeshotsav 2024 : महाराष्ट्र सदनात गणेश उत्सवानिमित्त कार्यक्रमांची रेलचेल

राजधानी दिल्लीतील विविध मराठी गणेश मंडळांतही गणरायांचे उत्साहात स्वागत

79
Ganeshotsav 2024 : महाराष्ट्र सदनात गणेश उत्सवानिमित्त कार्यक्रमांची रेलचेल
  • प्रतिनिधी

ढोल-ताशांवरील ठेका आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जय घोषाने कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदन दुमदुमले. लाडक्या बाप्पांच्या आगमनासाठी गणेशभक्तांनी एकच गर्दी केली. गणरायाच्या आगमनासाठी असेच जल्लोषपूर्ण व भक्तीमय वातावरण संपूर्ण दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात दिसून आले. महाराष्ट्र सदनातील सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्यावतीने काॅपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात शनिवारी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच दिल्लीच्या वेगवेगळ्या भागातील विविध गणेश मंडळातही उत्साहाच्या वातावरणात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. (Ganeshotsav 2024)

(हेही वाचा – Bangladesh बांगलादेशात कथित ईशनिंदेच्या आरोपाखाली हिंदू विद्यार्थ्याची विद्यापिठातून हकालपट्टी)

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आनंद व उत्साहाच्या वातावरणात साजरा होणारा गणेशोत्सव महाराष्ट्राबाहेर राजधानी दिल्लीतही उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. महाराष्ट्र सदनात सार्वजनिक उत्सव समितिच्यावतीने आयोजित गणेशोत्सवात महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त रूपिंदर सिंग यांनी गणरायाची पूजा केली. सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार यांच्यासह दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, गणेश भक्त यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Ganeshotsav 2024)

(हेही वाचा – स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शिक्षण घेतलेल्या शाळेस Veer Savarkar यांची मूर्ती भेट)

येथील काॅपर्निकस मार्गावर जल्लोषात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. “गणपती बाप्पा मोरया”, “मंगलमूर्ती मोरया” या घोषणा, ढोल-ताशांचा गजरामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले. मिरवणुकीनंतर शासकीय पूजा, मंत्रोच्चार व श्रींची आरती होऊन गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातील जवळपास ३८ मराठी गणेशोत्सव मंडळातही गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांच्या आगमनाचा जल्लोष सर्वत्र साजरा करण्यात आला. (Ganeshotsav 2024)

(हेही वाचा – Red Sandalwood Smuggling : १० कोटींच्या रक्तचंदनाची तस्करी करणार्‍यांना अटक)

गणेशोत्सव काळात कार्यक्रमांची रेलचेल

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दिल्ली व परिसरात गणेशोत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल आहे. विविध गणेश मंडळांनी या काळात महाराष्ट्राच्या वैविद्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मराठमोळी लावणी, नाटक, संगीत रजनी, झांज पथकांचे सादरीकरण, कीर्तन, भजन संध्या आदी कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन यावर्षीच्या गणेशोत्सवादरम्यान करण्यात आले आहे. विविध क्षेत्रात कार्यरत मराठींसह अमराठी गणेशभक्तही गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. (Ganeshotsav 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.