Ganeshotsav 2024 : मुंबईत आतापर्यंत १२३७ मूर्तिकारांकडून मंडप परवानगीसाठी अर्ज

264
Ganeshotsav 2024 : मुंबईत आतापर्यंत १२३७ मूर्तिकारांकडून मंडप परवानगीसाठी अर्ज

यंदाचा गणेशोत्सव २०२४ (Ganeshotsav 2024) पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेकडून विशेष लक्ष देण्यात आले आहे. यासाठी श्रीगणेश मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तीकारांना मोफत शाडूची माती, मंडपासाठी नि:शुल्क जागा (प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार) देण्यात आली आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवासाठी मूर्तीकांराना देण्यात आलेली परवानगी नवरात्रोत्सवापर्यंत कायम राहणार आहे. याशिवाय मूर्तीकारांसाठी एक खिडकी योजना देखील राबविण्यात आली आहे. यासाठी आतापर्यंत १२३७ मूर्तिकारांकडून मंडप परवानगीसाठी ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत.

मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाचा श्री गणेशोत्सव (Ganeshotsav 2024) साजरा करण्यात येत आहे. मुंबई महानगराची सांस्कृतिक ओळख असणारा श्री गणेशोत्सव ७ सप्टेंबर २०२४ पासून सुरू होत आहे. हा उत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक व्हावा, यासाठी महानगरपालिका सातत्याने विविध स्तरिय प्रयत्न करित आहे. यंदा महानगरपालिका प्रशासनाने उत्सवादरम्यान विविध स्तुत्य उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून उत्कृष्ट काम करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना यावर्षीपासून सलग पाच वर्षांसाठी परवानगी देण्यात येणार आहे.

(हेही वाचा – Medical student’s suicide: वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थिनीची महाविद्यालयात आत्महत्या; कारण अस्पष्ट)

आतापर्यंत ५०० टन मोफत शाडू मातीचे वाटप

संपूर्ण मुंबईत पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी महानगरपालिकेने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आतापर्यंत मोफत शाडू मातीसाठी एकूण २१७ मूर्तिकारांनी मागणी केली असून, त्यांना आतापर्यंत सुमारे ५०० टन मोफत शाडू माती देण्यात आली आहे. यावरून शाडू मातीपासून तयार केलेल्या श्री गणेश मूर्ती स्थापना करण्याचे प्रमाण यंदा वाढणार आहे.

गणेशोत्सव २०२४ सुरळीत पार पडावा यासाठी उपायुक्त (परिमंडळ २) श्री. प्रशांत सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत सहायक आयुक्त (जी उत्तर) अजितकुमार आंबी, सहायक आयुक्त (के पूर्व) मनिष वळंजू, सहायक आयुक्त (एन) गजानन बेल्हाळे यांचा समावेश आहे. (Ganeshotsav 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.