दरवर्षी बेस्टतर्फे गणेशोत्सवादरम्यान रात्रभर सेवा दिली जाते. गेल्यावर्षी बेस्टने गणेशोत्सवाच्या शेवटच्या पाच दिवसांत रात्रभर जादा बस चालविल्या होत्या. परंतु यंदा राज्य सरकारच्या सूचनेनुसार संपूर्ण गणेशोत्सवादरम्यान (१० दिवस) रात्रभर जादा बस चालविण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. (Ganeshotsav Best Buses)
(हेही वाचा – Mumbai-Goa Highway गणेशोत्सवापूर्वी खड्डे मुक्त होणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिल्या सूचना)
मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव पाहण्यासाठी देशासह जगभरातील पर्यटक मुंबईत येतात. सार्वजनिक गणेशोत्सवाचे देखावे पाहण्यासाठी रात्रीच्या वेळी मोठी गर्दी होते. परंतु उपनगरीय लोकलची वाहतूक रात्री दोन वाजल्यानंतर बंद होते. त्यामुळे मध्यरात्री पहाटेपर्यंत गणेशोत्सव फिरणाऱ्यांची मोठी गैरसोय होते. घरी जाण्यासाठी कोणतेही वाहन मिळत नसल्याने खासगी वाहनांशिवाय पर्याय नसतो. भाविक पर्यटकांची हीच गैरसोय दूर करण्यासाठी गणेशोत्सवातील १० दिवस रात्रभर ९ मार्गांवर २४ जादा बस चालविण्यात येणार आहेत.
मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींचे भाविक, पर्यटकांना रात्रभर दर्शन घेता यावे, याकरिता बेस्टकडून गणेशोत्सवादरम्यान नऊ मार्गांवर २४ जादा बस जाड्या चालविण्यात येणार आहेत. रात्री साडेदहा ते पहाटे ६ वाजेपर्यंत या जादा बस धावणार असल्याने भाविक, पर्यटक आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या मार्गांवर सोडणार जादा बस
* ४ लि. डॉ. एम. इक्बाल चौक ते ओशिवरा आगार,
* ८ लि. जिजामाता उद्यान ते शिवाजी नगर टर्मिनस,
* ए-२१ डॉ.एस.पी.एम. चौक ते देवनार आगार,
* ए- २५ बैंकबे आगार ते राणी लक्ष्मीबाई चौक (सायन),
* ए-४२ पं. पळुस्कर चौक (ऑपेरा हाऊस) ते सँन्डहर्स्ट रोड स्थानक,
* ४४ वरळी गाव ते एस. यशवंतराव चौक (काळाचौकी),
* ५१ इलेक्ट्रिक हाऊस ते सांताक्रुझ आगार,
* ६९ डॉ.एस.पी.एम चौक (म्युझियम) ते पी.टी. उद्यान, शिवडी,
* ६६ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते राणी लक्ष्मीबाई चौक (शीव). (Ganeshotsav Best Buses)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community