Ganeshotsav : चाकरमान्यांसाठी खुशखबर! गणेशोत्सवासाठी एसटीचे आरक्षण सुरू

63
Ganeshotsav : चाकरमान्यांसाठी खुशखबर! गणेशोत्सवासाठी एसटीचे आरक्षण सुरू
Ganeshotsav : चाकरमान्यांसाठी खुशखबर! गणेशोत्सवासाठी एसटीचे आरक्षण सुरू

गणेशोत्सव (Ganeshotsav), दिवाळी अशा सणासुदीला गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. प्रवाशांच्या सुविधेसाठी एसटी गाड्यांचे आरक्षण ६० दिवसआधी खुले करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. यापूर्वी ३० दिवस आधी गाड्यांचे आरक्षण करण्याची मुभा होती.

(हेही वाचा- Arvind Kejriwal यांनी दिल्ली महिला आयोगाची ताकद केली कमी)

रेल्वेगाड्यांचे आरक्षण १२० दिवसआधी करता येते. उत्सवकाळातील गाड्यांना होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रवाशांनी आरक्षण करूनच सुखरूप प्रवास करावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. कोकणासह राज्यातील सर्व विभागांमध्ये गणेशोत्सव काळासाठीचे नियमित आणि विशेष गाड्यांचे आरक्षण गुरुवारपासून खुले होणार आहे. सध्या धावणाऱ्या नियमित गाड्या वेळापत्रकाप्रमाणे सुटतील. (Ganeshotsav)

मुंबई सेंट्रल, परळ, पनवेल आणि कुर्ला नेहरूनगर येथून २ आणि ३ सप्टेंबरपासून जादा गाड्या सुटणार आहेत. कणकवली, राजापूर, विजयदुर्ग, दापोली, भालावली, देवगडदरम्यान जादा एसटी फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. गणेशोत्सवासाठीचे जादा गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. (Ganeshotsav)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.