Ganeshotsav: पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जानेवारीपासूनच महापालिका तयारीला लागणार

यावर्षी मुंबईतील  ३५ टक्के घरगुती गणेश मूर्ती पर्यावरणपूरक होत्या

134
Ganeshotsav: पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जानेवारीपासूनच महापालिका तयारीला लागणार
Ganeshotsav: पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जानेवारीपासूनच महापालिका तयारीला लागणार

मुंबईतील गणेशोत्सव (Ganeshotsav) हा जगातील सर्वात मोठा पर्यावरणपूरक गणेशोत्सव व्हावा यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. यावर्षी त्या दृष्टिकोनातून पावले पडली आहेत. त्यामुळे पुढील वर्षांतील गणेशोत्सव पर्यावरणपूरक पार पडला जावा यासाठी कृती आराखडा आखून येत्या वर्षांतील जानेवारी महिन्यात बैठक घेऊन हा उत्सव पर्यावरणपूरक करण्याचा प्रयत्न केला जाईल,असे आश्वासन महापालिका अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांनी गणेशोत्सव समन्वय समितीसह सर्व मंडळांच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना दिले.

मुंबई महानगरपालिकेद्वारे आयोजित श्री गणेश गौरव स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी महापालिका मुख्यालयात पार पडला. या विजेत्या गणेश मंडळांचा गौरव अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे व उपायुक्त (परिमंडळ – २) रमाकांत बिरादार यांच्या हस्‍ते सन्‍मानचिन्‍ह, प्रशस्‍त‍ीपत्र, तुळशीचे रोप व धनादेश प्रदान करून करण्यात आला. याप्रसंगी महानगरपालिका सचिव (प्रभारी) संगीता शर्मा, सहायक आयुक्त (डी विभाग) शरद उघडे, बृहन्‍मुंबई सार्वजनिक गणेशोत्‍सव समन्‍वय समितीचे अध्‍यक्ष अॅड. नरेश दहिबांवकर, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे कार्यवाह सुरेश सरनोबत यांच्‍यासह स्पर्धेचे परीक्षक, सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते. याप्रसंगी बोलतांना आश्विनी भिडे यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची आवश्यकता गेल्या काही वर्षांपासून सांगत आहोत. त्यासाठी न्यायालयानेही आपले कान टोचले, परंतु आता आपल्याला मुंबईचा गणेशोत्सव हा जगातील सर्वात मोठा पर्यावरणपूरक उत्सव कसा होईल याकडेही लक्ष द्यावे लागेल. त्याची सुरुवात आपण या वर्षांपासून केली, त्यात आपल्या सर्वांचे सहकार्य आहे, यामध्ये समन्वय समितीचा सिंहाचा वाटा आहे.

(हेही वाचा – Black Day : बेळगावात काळा दिवस, महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात प्रवेशबंदी)

वातावरणीय बदलाचे जे संकट आहे, ते आपल्या दारापर्यंत येवून थांबलेले आहे आणि गणपती हा आपला विघ्नहर्ता असतो, हा संकटाचा हरण करतो. हाच गणपती वातावरणीय बदलाचे हरण निश्चितपणे करणार आणि त्याच्यासाठी आपण यात सहभागी व्हायला हवे,असे त्यांनी सांगितले.

प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती पाण्यात सोडतो, तेव्हा ती पूर्णपणे विरघळत नाही, आणि त्यामुळे प्रदषण होते, त्यामुळेच ज्या उद्देशाने आपण गणेशोत्सव साजरा करतो, तोच उद्देश साध्य होत नाही. उत्सवामध्ये अर्थव्यवस्था महत्वाची असते, त्यामुळे सर्वांचा विचार करता यासाठी कृती आराखडा तयार करून आपल्या सर्वांच्या सूचनांचा विचार केला जाईल. त्यामुळे आपल्या सुचनांप्रमाणे जानेवारी महिन्यांतच यासाठीचा निर्णय घेतला जाईल, जेणेकरून हा उत्सव अधिकाधिक पर्यावरण पुरक साजरा करता येईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पर्यावरणपूरक गणपतीसाठी महापालिकेच्यावतीने यावर्षी महानगरपालिकेकडून प्रत्येक विभागांमध्ये मोफत शाडू माती आणि मूर्तीकारांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली. याचा खूप चांगला परिणाम दिसून आला. यंदा थोडाफार उशिरा झाला असला तरी पुढील वर्षी आधीच देण्याचा प्रयत्न केला जाईल,असे त्यांनी सांगितले.

यावर्षी मुंबईतील  ३५ टक्के घरगुती गणेश मूर्ती या पर्यावरणपूरक होत्या. दोन-तीन वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना या वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची किती आवश्यकता आहे हे नागरिकांना पटवून दिले जात आहे. या वर्षी १९४ कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली होती. गणेशोत्सव हा फक्त एक उत्सव नसून त्यावर अवलंबून घटकांचा विचार करून कृती आराखडादेखील तयार करण्याची गरज आहे. मुंबईतील गणेशोत्सव हा आगळा-वेगळा, सर्वसामान्यांना सामावून घेणारा असतो. मुंबई हे अतिशय गजबजलेले महानगर असतानाही येथील गणेशोत्सव शांततापूर्ण वातावरणात पार पडतो. महानगरपालिका (Municipal Corporation) , पोलिस (police) आणि इतर यंत्रणांच्या सहकार्याने यंदाचा गणेशोत्सव शांततेत पार पडला, याबद्दल सर्व यंत्रणांचे त्यांनी आभारही मानले केले.

उपायुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार यांनी प्रास्ताविक करताना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी पर्यावरणपूरक साहित्याचा अधिकाधिक वापर, मंडळांकडून गणेशोत्सवाशिवाय वर्षभर राबविण्यात येणारे सामाजिक उपक्रम, या सर्व बाबींचा विचार करून गणेश गौरव पुरस्कारासाठी निवड केली जाते, असेही त्यांनी नमूद केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.