मुंबई ते गोवा रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट दर अधिक असल्यामुळे या गाडीला कसा प्रतिसाद मिळतो, याची उत्सुकता होती. मात्र, या गाडीची तिकीट विक्री सुरू होताच अवघ्या १० मिनिटांत गणेशोत्सवाचे बुकिंग फुल्ल झाले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.
कोकण रेल्वे मार्गावर २७ जूनपासून वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला. या गाडीला एकूण ८ डबे जोडण्यात आले असून, त्यांची आसन क्षमता ५३० इतकी आहे. त्यात एक डबा एक्झिक्युटिव्ह, तर इतर ७ बोगी या चेअर कार आहेत. एक्झिक्युटिव्ह बोगीतील तिकीट दर ३ हजार ३६०, तर चेअर कारमधील तिकीट दर १ हजार ८१५ आहे.
(हेही वाचा – महाराष्ट्रात जन्म झालेल्या ‘मल्लखांब’चा शासनमान्य खेळांच्या यादीत समावेश नाही; खेळाडूंचे भविष्य अधांतरी)
या मार्गावर धावणाऱ्या इतर गाड्यांच्या तुलनेत वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट दर अधिक असल्यामुळे या गाडीला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल अनेकांनी साशंकता व्यक्त केली होती. मात्र, तिकीट महाग असले तरी अत्याधुनिक सोयी सुविधा आणि प्रवासाचा वेळ लक्षात घेऊन प्रवाशांनी या गाडीला पसंती दर्शवली आहे.
या गाडीचे बुकिंग सुरू होताच प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून, गणेशोत्सवासाठी तर पहिल्या दहा मिनिटांत वेटिंग लिस्ट लागली आहे. इतर दिवशीही या गाडीला चांगला प्रतिसाद मिळत असून, ५० टक्क्यांहून अधिक तिकिटे बुक झाल्याचे संकेतस्थळावर दिसत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community