तुमच्या खिशातून मोबाईल होऊ शकतो चोरी! कसा तो वाचा?

मुंबई आणि ठाण्यात मोबाईल चोरी करणाऱ्या १० ते १२ कंपन्या काम करत असून एका कंपनीमध्ये १५ ते १६ मशीन काम करतात.

87

मुंबईत ९०च्या दशकात ज्या पद्धतीने रेल्वे आणि बेस्ट बसमध्ये पाकिटमारांच्या टोळ्या कार्यरत होत्या, त्याच प्रकारच्या मोबाईल चोरांच्या टोळ्या मुंबईत कार्यरत असल्याचे समोर आले आहे. या टोळ्यांना ‘कंपनी’ असे नाव देण्यात आले असून मोबाईल चोराला ‘मशीन’ असे म्हणतात. या मशीनच्या टार्गेटवर असणाऱ्या प्रवाशांच्या मोबाईलला ‘कौआ’ म्हटले जाते.

अशी आहे यंत्रणा!

मुंबई आणि ठाण्यात अशा प्रकारच्या १० ते १२ कंपन्या काम असून एका कंपनीमध्ये १५ ते १६ मशीन काम करतात. प्रत्येक कंपनीचा एक म्होरक्या असतो आणि त्याला ‘भाई’ म्हणून ओळखले जाते. महत्वाचे म्हणजे ‘मशीन’ आणि ‘भाई’ मध्ये एक व्यक्ती काम करतो त्याला ‘एजंट’ बोलले जाते. हा एजंट मशीनकडून चोरलेले कौआ (मोबाईल फोन) घेऊन ते कंपनीच्या भाईला पोहचवण्याचे काम करतो. प्रत्येक कौआ मागे मशीनला २ ते ४ हजार मिळतात. भाई हे कौआ (मोबाईल फोन) जमा करून दोन आठवड्यांनी त्याचे पार्सल करून कुरिअरने किंवा स्वतःच्या माणसाच्या हातून हे पार्सल पश्चिम बंगाल येथे रवाना केले जाते. तेथून ते पार्सल बांगलादेश आणि नेपाळ या देशात पाठवले जाते.

(हेही वाचा : जागतिक पातळीवरून हिंदुत्वाचे उच्चाटन करण्यासाठी ‘हे’ रचले आहे षडयंत्र!)

मुंबई, ठाण्यात १०-१२ कंपन्या!

मुंबई, ठाण्यात १० ते १२ कंपन्या असून प्रत्येक कंपनीने आपला परिसर ठरवून घेतलेला आहे. एक दुसऱ्याच्या परिसरात शिरकाव करायचा नाही, केल्यास ज्या परिसरातून मोबाईल चोरला असेल तो मोबाईल त्याच परिसरात कंपनीचा होईल, असा नियम या कंपन्यांनी करून घेतला आहे. या कंपन्या अंधेरी, बोरिवली, कुर्ला, गोवंडी, शिवाजी नगर, मुंब्रा, कल्याण आणि वसई येथे कार्यरत आहे. या कंपन्यातील मशीन त्याच्या विभागातील रेल्वे स्थानक, बस स्थानकात टार्गेट फिक्स करून त्याच्याकडील कौआ उडवण्याचे काम करतात. या कंपन्या मागील काही वर्षांपासून रेल्वे आणि शहरातील बेस्ट बसमध्ये मोबाईल चोरीचे काम करीत आहे. रेल्वे पोलिसांनी काही वर्षांपूर्वी चोरीचे मोबाईल फोन विकत घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केल्यानंतर या कंपन्या तयार झाल्या आणि हे परस्पर चोरीचे मोबाईल घेऊन ते मुंबईत त्याची विक्री न करता थेट बांगलादेश आणि नेपाळ येथे पाठवण्यात येत होते. विलेपार्ले पोलिसांनी अटक केलेल्या जाहीद शेख हा एका टोळीचा म्होरक्या असून त्याची कंपनी वांद्रे ते बोरिवलीपर्यंत चालते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.