ज्या शाळेत हिंदू विद्यार्थिनींना हिजाब घालण्याची सक्ती करण्यात आली त्या शाळेवर मध्य प्रदेश सरकार बुलडोझर चालवणार आहे. शाळेतील मुख्याध्यापिकेसह तीन महिला शिक्षकांनी इस्लाम धर्म स्वीकारल्याची बाबही समोर आली आहे. दमोहच्या ‘गंगा जमना स्कूल’वर बुलडोझर चालवण्याआधी त्यांना १५ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. रविवारी, 11 जून 2023 रोजी महापालिकेने शाळेला नोटीसही पाठवली आहे. प्रत्यक्षात परवानगी न घेता शाळेची इमारत बांधण्यात आली आहे.
या शाळेचा मालक राशिद खान आहे, परंतु कागदपत्रांमध्ये त्याची पत्नी रश्क-ए-जहाँ ही मालकीण आहे. या शाळेपासून मशिदीपर्यंत गुप्त मार्ग बनवण्यात आल्याचेही नुकतेच उघड झाले आहे. शाळेशी संबंधित लोकांनाही ताब्यात घेण्यात येत आहे. अनेक जण फरार आहेत. पेट्रोल पंप आणि दुकानांसह शाळाचालक आणि त्याच्या नातेवाईकांच्या इतर अनेक व्यवसायांवरही छापे टाकण्यात आले. मुख्याध्यापिका अफसा शेख, गणिताचे शिक्षक अनस अथर आणि चौकीदार रुस्तुम हे आधीच तुरुंगात आहेत.
‘गंगा जमना शाळे’ने नोटिशीला १५ दिवसांत समाधानकारक उत्तर न दिल्यास बुलडोझरचा वापर करून इमारत पाडण्यात येईल. राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी तपास योग्य दिशेने सुरू आहे. मुख्य महापालिका अधिकारी भैय्या लाल यांनीही शाळेची पाहणी केली आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
(हेही वाचा Muslim : मुंब्रा सारख्या धर्मांतराच्या विरोधात मोक्का कायदा आणण्याची मागणी करणार – प्रसाद लाड)
Join Our WhatsApp Community