Gangotri Highway Accident : गंगोत्री महामार्गावर बस दरीत कोसळून सात जणांचा मृत्यू

जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

127
Gangotri Highway Accident : गंगोत्री महामार्गावर बस दरीत कोसळून सात जणांचा मृत्यू

उत्तराखंडमधील गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर (Gangotri Highway Accident) गंगनानीजवळ एक प्रवासी बस १०० मीटर खोल दरीत कोसळली. या बसमध्ये ३३ प्रवासी होते. यामधील ७ जणांचा मृत्यू झाला असून २७ जणांना वाचवण्यात यश आले आहे.

गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर (Gangotri Highway Accident) रविवारी (२० ऑगस्ट) दुपारी सव्वा चारच्या सुमारास हा अपघात झाला. गंगनानीजवळ एक खाजगी प्रवासी बस खोल दरीत कोसळली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून २७ जणांना वाचवण्यात यश आले आहे. बसमध्ये एकूण ३३ यात्रेकरू होते. ते सर्व गुजरातचे रहिवासी होते. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस गंगोत्री धामहून उत्तरकाशीच्या दिशेने जात होती. त्या दरम्यान चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस सुरक्षा पट्टी तोडून १०० मीटर खोल दरीत कोसळली आणि झाडीत अडकली.

(हेही वाचा – Veer Savarkar : बाल वयातच सावरकरांच्या लेखन प्रवासाची सुरुवात)

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातहून आलेल्या यात्रेकरूंनी भरलेली बस क्रमांक UK 07 PA 8585 गंगोत्री महामार्गावर गंगनानीजवळ (Gangotri Highway Accident) खोल दरीत कोसळली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस, एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी बचावकार्य सुरू केले. उत्तरकाशीचे डीएम अभिषेक रुहेला आणि एसपी अर्पण यदुवंशी घटनास्थळी पोहोचले.

ज्या ठिकाणी बसचा अपघात झाला, त्याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी एका ट्रकचा अपघात (Gangotri Highway Accident) झाला होता. रविवारी झालेल्या अपघातात बस दरीत पडलेल्या ट्रकच्या मलब्यावर पडली. त्यामुळे बस थेट भागीरथी नदीत पडण्यापासून वाचली.

मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ट्वीट करून अपघाताबद्दल (Gangotri Highway Accident) शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे, अपघातात काही लोकांचे प्राण गेले तर काही जखमी झाल्याची बातमी आली आहे. बचावकार्य सुरू आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या आत्म्याला देव शांती देवो. सर्व जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.