कॅनडा आणि भारत यांच्यातील तणावादरम्यान India vs Canada राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) 11 गुंड-दहशतवाद्यांची यादी फोटोंसह जारी केली आहे. ते राजरोसपणे भारतात गुन्हे करून कॅनडामध्ये आश्रय घेत आहेत. या यादीत पहिले नाव आहे गँगस्टर गोल्डी ब्रारचे. त्याने पंजाबचा प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवालाची हत्या केली. यानंतर तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोई दुसऱ्या क्रमांकावर आहे.
याशिवाय NIA ने अर्शदीप सिंग गिल उर्फ अर्श डल्ला, दरमन सिंग काहलॉन, लखबीर सिंग, दिनेश शर्मा उर्फ गांधी, नीरज उर्फ पंडित, गुरपिंदर, सुखदुल, गौरव पटियाल उर्फ सौरभ गँगस्टर दलेर सिंग यांचे फोटो जारी केले आहेत. एनआयए (NIA) चे म्हणणे आहे की, भारतात खून आणि खंडणी व्यतिरिक्त, त्यांच्यावर पाकिस्तानच्या चिथावणीवरून देशविरोधी गुन्हे केल्याचा आरोप आहे. त्यापैकी बहुतांश कॅनडामध्ये लपलेले आहेत.
कॅनडात चैनीचे जीवन जगत आहेत गुंड
एनआयए (NIA) ने ज्या 11 गुंडांचे फोटो जारी केले आहेत, त्यापैकी पंजाबमध्ये गुन्हे करून पळून गेलेले 7 गुन्हेगार अ श्रेणीतील आहेत. हे सर्व गुन्हेगार कॅनडात चैनीचे जीवन जगत आहेत. आता हे सर्वजण खलिस्तानी लोकांसह तरुणांना फसवून गुन्हेगारीच्या जगात ढकलत आहेत. शीख फॉर जस्टीस, खलिस्तान टायगर फोर्स, वर्ल्ड शीख संघटना, बब्बर खालसा इंटरनॅशनल या कॅनडाच्या भूमीतील 9 फुटीरतावादी संघटना भारतविरोधी काम करत आहेत. या सर्व फुटीरतावादी संघटनांचा दहशतवाद आणि मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांशी थेट संबंध आहे. या फुटीरतावादी संघटनांचे प्रमुख कुख्यात दहशतवादी आहेत, असेही म्हणता येईल.
(हेही वाचा Canada : आता कॅनडातील भारतीयांसाठी केंद्र सरकारची ट्रॅव्हल अॅडव्हायजरी)
Join Our WhatsApp Community