चाकरमान्यांनो गणपतीक गावाक जातास? मगे याच महिन्यापासून करा बुकींग

105

कोरोनाचे नियम शिथील झाल्यामुळे यंदा गणेशोत्सव जोरात असणार आहे. गणेश भक्तांचा यंदा उत्साह द्विगुणीत झाला आहे. कोकणात जाणा-या चाकरमान्यांची संख्या गणोशोत्सवादरम्यान, प्रचंड मोठी असते. आता चाकरमान्यांच्या या उत्साहात अधिक भर पडली आहे. कारण गणेशोत्सवासाठी रेल्वे तिकीट बुकींग एप्रिल अखेरीपासून सुरु होणार आहे.

28 एप्रिलपासून बुकींग सुरु

यंदा 10 दिवस आधीच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. 31 ऑगस्ट रोजी गणपतीचे आगमन होणार आहे. त्यामुळे तिकीट बुकींग हे 120 दिवस आधीच सुरु होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तिकीटांचे आरक्षण साधारणपणे 28 एप्रिलपासून सुरु केले जाणार आहे.

( हेही वाचा: ‘जिल्हा परिषदे’ च्या शाळांमध्ये विज्ञान विषयाचे शिक्षकच नाहीत! )

कोकण रेल्वे विद्युत वेगाने धावणार

कोकणात होळी आणि गणेशोत्सव हे सण पारंपारिक पद्धतीने साजरे केले जातात. चाकरमान्यांना आत्तापासूनच गणपतीचे वेध लागले आहेत. कोरोनाच्या परिस्थितीमुळे मागच्या दोन वर्षांत निर्बंधांमुळे मोठ्या प्रमाणात लोकांना गावी जाता आले नव्हते, मात्र यंदा गणपती स्पेशल गाड्यांचे बुकींग सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे एकूणच चाकरमान्यांना सुविधा उपलब्ध होणार आहेत. कोकण रेल्वेचे विद्युतीकरणदेखील पूर्ण झाल्याने गाडीचा वेगही वाढणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.