गणेशोत्सवात कोकण रेल्वेच्या (Konkan Railway) नियमित गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्यानंतर पश्चिम रेल्वेने (Western Railway) सहा गणपती स्पेशल गाड्या (Ganpati Special train) चालवण्याचा निर्णय घेतला होता. गणेशभक्तांसाठी हा सुखद धक्काच होता. मात्र, या साऱ्या गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने पुन्हा पदरी निराशा पडली.
आरक्षणात गैरप्रकार झाला का?
आरक्षण खुले होताच अवघ्या १ मिनिटात तिकीटे फुल्ल झाली. समोर रिग्रेट दिसु लागले. या प्रकारामुळे आरक्षणात गैरप्रकार झाला का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज, २८ जुलै रोजी कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी सोडण्यात आलेल्या गाड्यांचे आरक्षण सुरू होणार होते. आरक्षण तिकीटे मिळवण्यासाठी अनेक चाकरमानी लॅपटॅाप, मोबाईलवर लॅाग इन करुन बसले होते. मात्र ८ वा. आरक्षण सुरू झाले तेव्हा सर्व गाड्यांसमोर रिग्रेट दाखवले. (Ganpati Special train)
नेहमीप्रमाणे १ मिनिटात आरक्षण फुल्ल झाल्याने अनेकांना आरक्षित तिकीटे भेटली नाहीत. या प्रकारामुळे आरक्षणात गैरप्रकार झाला असल्याचे आरोप समाजमाध्यमांतून होत आहे. (Ganpati Special train)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community