Garbage On Railway Track: रेल्वे रूळांवरील कचऱ्याचा प्रश्न गंभीर; ऑक्टोबर महिन्यात तब्बल १२० टन कचऱ्याची विल्हेवाट

59
राज्यात ‘स्वच्छता अभियाना’वर (Cleanliness campaign) भर दिला असतानाच, मुंबईत रेल्वे रुळांवर जमा होणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुंबईसह इतर ठिकाणी रेल्वे मार्गांवरील कचरा उचलल्यानंतरही तेवढ्याच प्रमाणात रुळांवर पुन्हा येत आहे. दरम्यान, मध्य रेल्वेच्या (Central Railway) रुळांवर ऑक्टोबर महिन्यात १२० टन कचरा आढळून आला आहे. तसेच स्वच्छता पंधरवडा (Swachhata Pandharwada) निमित्त विशेष स्वच्छता मोहीम राबवून कचऱ्याची विल्हेवाट करण्यात आली. 
या उपक्रमाअंतर्गत ४६१.७ किलोमीटर लांब रेल्वे रुळ आणि नाल्यांची ११६ किलोमीटरपर्यंत साफसफाई करण्यात आली. ही मोहीम रेल्वे स्थानकांच्या आणि रेल्वे रुळांच्या स्वच्छतेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. असून, रुळांलगतच्या वसाहतींमधील नागरिकांकडून टाकण्यात येणारा कचरा रेल्वे व्यवस्थापनासाठी (Waste Railway Management) गंभीर समस्या ठरली आहे. रेल्वे रुळांवर साचणाऱ्या कचऱ्यामुळे ते गंजण्याची भीती असते. ट्रॅक सर्किटमध्ये तांत्रिक बिघाड होत असल्यामुळे सिग्नल यंत्रणेवर परिणाम होतो.

(हेही वाचा – CM Eknath Shinde यांनी राज्यपालांकडे सोपवला राजीनामा; काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती)

मध्य रेल्वेने (Central Railway) रुळ ओलांडणे (Cross the tracks) आणि कचऱ्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी रक्षा भिंती आणि लोखंडी जाळ्या उभारण्यास सुरुवात केली आहे. ज्या भागात रुळ ओलांडणे आणि रुळांवर सर्वाधिक कचरा टाकण्याच्या घटना घडतात. अशा ठिकाणी मध्य रेल्वेने मुंबई विभागामध्ये सुमारे १०० जागा निश्चित केल्या आहेत. तसेक रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रेल्वे रुळांवर होणाऱ्या मृत्यूच्या घटनांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त घटना रुळ ओलांडण्यामुळे होतात. त्या रोखण्यासाठी मध्य रेल्वेमार्फत सुमारे ३०० किमीची सुरक्षा भिंत आणि त्यावर लोखंडी जाळ्या लावण्याचे काम सुरू झाले आहे. या जाळ्यांची उंची सुरक्षा भिंतींपासून सुमारे १० ते १२ फूटहून अधिक आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.