Garlic Price Hike: लसणाच्या दरात हिवाळ्यात दुपटीने वाढ होण्याची शक्यता, जाणून घ्या कारण…

पुरवठ्याच्या समस्येमुळे आगामी काळात लसणाच्या दरात आणखी वाढ होऊ शकते.

206
Garlic Price Hike: लसणाच्या दरात हिवाळ्यात दुपटीने वाढ होण्याची शक्यता, जाणून घ्या कारण...
Garlic Price Hike: लसणाच्या दरात हिवाळ्यात दुपटीने वाढ होण्याची शक्यता, जाणून घ्या कारण...

कांद्याचे भाव वाढल्यानंतर आता लसणाच्या भाववाढीनेही सर्वसामान्यांचे (Garlic Price Hike) बजेट कोलमडले आहे. स्वयंपाकघरात फोडणीसाठी आवश्यक असणाऱ्या लसणाच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत. किलोमागे २५० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

सरकारी घाऊक बाजारात लसणाची किंमत १३० ते १४० रुपये प्रतिकिलो आहे, तर उत्तम दर्जाचा लसूण घाऊक बाजारात २२० ते २५० रुपये किलो दराने विकला जात आहे. लसणाच्या वाढलेल्या दरामध्ये डिसेंबर महिन्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – Rahul Dravid : राहुल द्रविड यांचा नवीन कार्यकाळ दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतरच ठरणार )

बाजारात वेगवेगळ्या दर्जाचा लसूण उपलब्ध आहे. लसणाची किरकोळ किंमत १८० ते ३०० रुपये प्रतिकिलो आहे, तर घाऊक किमती १५० ते २६० प्रतिकिलोच्या दरम्यान दिसत आहे. पुणे एपीएमसी (कृषी उत्पन्न बाजार समिती ) घाऊक विक्रेते विलास भुजबळ यांनी याविषयी सांगितले की, दरवर्षी या काळात लसणाचे भाव वाढतात. याचे कारण म्हणजे पुरवठा कमी असणे. पुरवठ्याच्या समस्येमुळे आगामी काळात लसणाच्या दरात आणखी वाढ होऊ शकते.

हेही पहा – 

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.