
पोलीस भरतीकरिता प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची कसून तयारी करवून घेतली जाते. त्यांचे प्रशिक्षणही कडक शिस्तीचे असते, मात्र छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरातील एका अकॅडमीत (Garud Zep Academy) प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी असह्य होणाऱ्या जाचामुळे आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
शहरातील पोलीस, सैन्य भरती करणाऱ्या नामांकित अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांचा छळ होत असल्याच्या कारणावरून २ विद्यार्थ्यांचा छळ होत होता. त्यामुळे त्यांनी त्यांचे आयुष्य संपवले. छत्रपती संभाजीनगर शहराचे पोलीस आयुक्त नितीन बगाटे यांनी वाळूज येथील अकॅडमीवर छापा टाकला होता. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या तपासणीत ही धक्कादायक माहिती उघड झाली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गरुडझेप अकॅडमीवर छापा टाकल्यामुळे ही धक्कादायक माहिती उघडकीस आली.
(हेही वाचा – Narendra Modi: पंतप्रधानांच्या हस्ते ओखा मुख्यभूमी आणि बेत द्वारका बेटाला जोडणाऱ्या ‘सुदर्शन सेतू’चे उद्घाटन )
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह पुणे, नाशिक यासह महत्त्वाच्या शहरांमध्ये नामांकित म्हणून गरुडझेप अकॅडमी ओळखली जाते. मोठमोठ्या जाहिराती देऊन विद्यार्थ्यांना आकर्षित करणाऱ्या या अकॅडमीच्या धक्कादायक माहिती
अनेक विद्यार्थी अर्ध्यातच शिक्षण सोडतात…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकॅडमीकडून विद्यार्थ्यांच्या छळाचे वेगवेगळे प्रकार समोर येत आहेत. विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीमध्ये अंगावर थंड पाणी टाकून पट्टा आणि लाकडी दांड्याने बेदम मारहाण करतानाचा व्हिडियो सर्वत्र व्हायरल होत आहे. अकॅडमीमध्ये पोलीस आणि सैन्य भरतीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा थर्ड डिग्री छळ कसा होतो, हे समोर आले आहे. या जाचामुळे अनेक विद्यार्थ्यांना अपुऱ्या सोयीसुविधा, पैशांसाठी छळ केला जात असल्याचं समोर आलं आहे. यामुळे अनेक विद्यार्थी अर्ध्यातच शिक्षण सोडून देत असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community