मुंबई विद्यापिठाच्या (Mumbai University) गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेच्या (Garware Institute) मराठी पत्रकारिता वर्गाच्या वतीने प्रतिवर्षी विविध पुरस्कार घोषित केले जातात. यंदा पत्रकारिता वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली माजी विद्यार्थिनी वनश्री राडये ही ‘दि.वि. गोखले पुरस्कारा’ची मानकरी ठरली आहे. माजी विद्यार्थी सुशांत सावंत यांना ‘विद्याधर गोखले पुरस्कार’, तर प्रवीण मरगळे यांना ‘डॉ. अरुण टिकेकर पुरस्कार’ घोषित झाला आहे.
(हेही वाचा – BCCI Code of Conduct : खेळाडूंच्या विरोधानंतरही बीसीसीआय परदेश दौऱ्यातील आचारसंहितेवर ठाम)
मराठीत युद्धपत्रकारिता रुजवलेले ज्येष्ठ दिवंगत पत्रकार दि.वि. गोखले (DV Gokhale) यांची रविवार, २३ मार्च या दिवशी १०२ वी जयंती साजरी केली जाणार आहे. या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा साजरा करण्यात येईल. सकाळी ११ ते २ या वेळेत संस्थेच्या प्रेक्षागारात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या सोहळ्यात वर्गाच्या ‘गरवारे दर्पण’ (Garware Darpan) या अंकाचे प्रकाशनही करण्यात येईल. या समारंभाला साप्ताहिक ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित रहाणार आहेत. अश्विनी मयेकर यांचे ‘विद्यार्थ्यांसाठी कानमंत्र – स्वतःला पत्रकार म्हणून घडवताना’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
अखिल भारतीय साहित्य परिषद कोकण प्रांत आणि गरवारे व्यवसाय प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय लेखन स्पर्धेचे पुरस्कार वितरण देखील ज्येष्ठ पत्रकार आणि कवी दुर्गेश सोनार यांच्या हस्ते या कार्यक्रमात होणार आहे. (Mumbai University)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community