आयओसीएल आकड्यानुसार गॅस सिलेंडरच्या (Gas cylinder) दरात सलग दुसऱ्या महिन्यात कपात करण्यात आली आहे. देशाचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सर्वसामान्यांना यातून दिलासा मिळणार आहे. ही कपात घरगुती वापराच्या सिलेंडरच्या दरात नसून व्यावसायिक सिलेंडरच्या दरात कपात झाली आहे. या महिन्यात व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या दरात ६.५ रुपयांची कपात करण्यात आली आहे. सलग दुसऱ्या महिन्यात ही कपात करण्यात आली आहे. मागच्या दोन महिन्यांतील दर कपात एकत्र केली, तर कमर्शियल गॅस सिलेंडरचे दर २० रुपयांपेक्षा जास्त कमी झाले आहेत. दुसऱ्या बाजूला घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मार्च २०२४ पासून कोणताही बदल झालेला नाही.
सलग दुसऱ्या महिन्यात कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात घसरण झाली आहे. देशाची राजधानी दिल्लीत कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात ७ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. सध्या हे दर १७९७ रुपये आहेत. कोलकातामध्ये (Kolkata) सर्वात कमी ४ रुपयांची कपात झाली आहे. तिथे दर आता १९०७ रुपये आहेत. मुंबई आणि चेन्नईत कमर्शियल गॅस सिलेंडरच्या (Commercial gas cylinder) दरात ६.५ रुपयाची कपात करण्यात आली आहे. त्यानंतर दोन्ही महानगरात कमर्शियल गॅस सिलेंडरचे दर अनुक्रमे १७४९.५० रुपये आणि १९५९.५० रुपये झाले आहेत. मागच्या दोन महिन्यात देशाची राजधानी दिल्ली आणि मुंबईत २१ रुपयांनी कमर्शियल गॅस सिलेंडरचे दर घसरले आहेत.
घरगुती गॅस सिलेंडरचा दर
दुसऱ्याबाजूला घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात सलग ११ व्या महिन्यात कोणताही बदल झालेला नाही. मार्च २०२४ मध्ये शेवटचा घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात बदल झाला होता. सरकारच्या घोषणेनंतर IOCL ने घरगुती गॅस सिलेंडरचे दर थेट १०० रुपयांनी कमी केले होते. तेव्हापासून आतापर्यंत घरगुती गॅल सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community